शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दहावीतील दोन मुली ठार

By admin | Updated: June 4, 2017 01:08 IST

अतीतजवळील घटना : दुचाकीवरून क्लासला जाताना झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज: दुचाकीवरून क्लासला जात असताना पाठीमागून कारने दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन्ही मुली जागीच ठार झाल्या. हा अपघात शनिवारी सकाळी साडेसात वाजता अतीत ता. सातारा येथे झाला. दोघींनीही दहावीची परीक्षा दिली होती.शिवानी अशोक काजळे (वय १६, रा. तुकाईवाडी ता. सातारा), जान्हवी पोपट जाधव (वय १६, रा. अतीत ता. सातारा) अशी अपघातात ठार झालेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या दोघींनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुटीमध्ये त्यांनी अतीतमध्येच संगणकाचा कोर्सला प्रवेश घेतला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सात वाजता शिवानी आणि जान्हवी दुचाकीवरून क्लासला जात होत्या. मात्र दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने त्या माजगाव फाट्याजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होत्या. यावेळी पुणे बाजूकडून कोल्हापूरकडे निघालेल्या कारने या दोघींना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारने धडक दिल्यानंतर या दोघीही हवेत उंच फेकल्या गेल्या. त्यानंतर त्या डांबरावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर जखम झाली. त्यामुळे दोघींचाही जागीच मृत्यू झाला.कार प्रचंड भरधाव वेगात असल्यामुळे या दोघींना धडक देऊन कार रस्त्या ओलांडून चक्क शेतात जाऊन उभी राहिली. या अपघातात दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दोन्ही मुलींचे मृतदेह महामार्गावर काहीवेळा तसेच पडून होते. काही नागरिकांनी तत्काळी एका खासगी वाहनाने नागठाणे येथील प्राथिमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनीही दोघींनाही मृत घोषीत केले.शिवानी आणि जान्हवीच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आक्रोश केला. हा आक्रोश पाहून ्नरुग्णालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनाही आपले आश्रू आवरता आले नाहीत.या अपघातानंतर बोरगाव पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.दोघी एकाच कॉलेजमध्ये घेणार होत्या प्रवेश !जान्हीवी अणि शिवानी दहावीमध्ये एकाच वर्गात शिकत होत्या. त्यामुळे दोघींची चांगली मैत्री झाली होेती. दहावीची परीक्षा झाली असतानाही दोघींनीही एकाच क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. जिकडे जाईल तिकडे दोघी एकत्र दिसायच्या. शिवानी ही अतीतमध्ये अत्याकडे वास्तव्यास होती. त्यामुळे त्यांचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे असायचे. अकरावीमध्ये एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, असे दोघींनीही ठरविले होते, असे त्यांच्या मैत्रिणी सांगत होत्या. शिवानीच्या एक भाऊ, आई वडील तर जान्हवीच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार आहे.