शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दोन दशकांचा वनवास संपला

By admin | Updated: April 6, 2016 23:49 IST

महाबळेश्वर : जिजामाता, गृहनिर्माण संस्थेच्या रस्त्याला हिरवा कंदील

महाबळेश्वर : अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या जिजामाता व मुन्नवर गृहसंस्थेकडे जाणाऱ्या जोड रस्त्यास महसूल व वनखात्याकडून परवागी मिळाली. वनखात्याच्या अनेक अग्निदिव्यातून दोन्ही गृहनिर्माण संस्थेचे सभासद अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत होते आ. मकरंद पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल व नगरसेवक कुमार शिंदे यांच्या प्रयत्नास यश आल्याने या दोन्ही गृहसंस्थेमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.जिजामाता व मुन्नवर गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेपासून येथील रस्त्याचा प्रश्न जैसे थे होता; मात्र वनखात्याच्या अनेक अडचणी येऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते. माजी उपनगराध्यक्षा छाया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आ. शिंदे यांना भेटल्यानंतर रस्त्याबाबतचा रितसर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आ. शिंदे यांनी केल्या होत्या. याबाबत विद्यमान नगरसेवक कुमार शिंदे यांनी भोपाळ, मुबंई येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फेब्रुवारी २०१६ मध्ये या संदर्भातील गरज व खुलासा देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांनी नागरिकांची बाजू प्रधान सचिवांकडे मांडून त्यांचे समाधान केले.शासन व वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर परिसर पर्यावरण दृष्टीने संवेदनशील असल्याने उच्चस्तरीय पर्यावरण संरक्षण समित्यांशी चर्चा करून शासनाने वनखात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी अंतिम चर्चा करून त्यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला. मुख्यमंत्री व मुख्यसचिव प्रवीण परदेशी यांच्या चर्चेनंतर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल व नगरसेवक कुमार शिंदे याच्याडे मंजुरीचे पत्र देण्यात आले. नागरिकांनी नगरसेवक कुमार शिंदे यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)पावसाळ्यापूर्वी काम मार्गी !जिजामाता व मुन्नवर गृह निर्माण सोसायटी मध्ये ३५० कुंटुबे राहत असून, ५०० मीटर लांब व ६ मीटर रुंद शासन मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे ०.३० हेक्टर ३० गुठे जमीन रस्त्यासाठी नगरपरिषद केंद्र शासनाकडे प्रस्ताव करणार असल्याचे नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी सांगून याची जबाबदारी नगरसेवक कुमार शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यासाठी सुमारे ३५ लाख खर्च येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे तोष्णीवाल यांनी सांगितले.रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. - कुमार शिंदे, नगरसेवक, महाबळेश्वर पालिका