शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

चोवीस तास पाणी योजनेची अवस्था गंभीर !

By admin | Updated: November 20, 2015 00:05 IST

जीवन प्राधिकरणाचा कारभार : नगरसेवक आक्रमक; ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या ठरावास मंजुरी --कऱ्हाड पालिका सभा

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात पालिकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चोवीस तास पाणी योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. योजनेचे काम पूर्ण करण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून विलंब लावला जात आहे. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची अवस्था गंभीर बनली आहे. योजनेचे काम करत असताना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अनेक चुका केल्या त्याचा त्रास आता पालिकेला सहन करावा लागत आहे. हे कदापिही सहन करून घेतले जाणार नाही. असे सांगत सर्व नगरसेवकांनी जीवन प्राधिकरणाच्या कारभाराविरोधात प्रशासनावर ताशेरे ओढले.दरम्यान, यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे बसविण्यात येणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या ठरावास मंजुरी दिली.कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण मासिक सभा पालिका सभागृहात गुरुवारी पार पडली. नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. सुुरुवातीपासूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाला जाणीवपूर्वक विलंब लावला जात आहे. जीवन प्राधिकरणाच्या कामातील चुकांमुळे पालिकेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे सांगत जीवन प्राधिकरणाकडून मागवण्यात आलेल्या मुदतवाढीला मंजुरी देताना त्यांच्यावर निर्बंधही लादले जावे, असे पावसकर यांनी सभागृहास माहिती दिली. तसेच पालिकेत वापरल्या जाणाऱ्या ई-गव्हर्नस संगणक कार्यप्रणालीचा वापर हा शासकीय तत्त्वावर केला जातो आहे, तो खासगी तत्त्वावर करण्यात यावा. या कार्यप्रणालीमध्ये अनेक चुका असून, वाढीव स्वरूपात व्याजातून कर आकारणी केली जात आहे. त्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. ती थांबवणे पालिकेची जबाबदारी आहे. कऱ्हाड पालिकेप्रमाणे राज्यातील इतर नगरपालिकांनी देखील शासनाच्या ई-गव्हर्नर कार्यप्रणालीतील वाढीव व्याज कर कमी करण्याबाबत ठराव करावा, अशी मागणी केली.या योजनेतील कामाबाबत नगरसेवकांनी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ई-गव्हर्नन कार्यप्रणालीबाबत शासनाकडे संबंधीत करवाढीचे अधिकार असून, वेळोवेळी पालिकेमार्फत करवाढ कमी करावा असा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी दिली. (प्रतिनिधी)शहरातील रस्त्यांचे होणार कारपेटीकरणशहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे अंतर्गत भागातील रस्त्यावर कारपेटीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय पालिकेच्या सभेत घेण्यात आला. शहरातील काही रस्त्याचे पॅचवर्कचे काम पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी दिली. अठ्ठावीस महिन्यांचा प्रलंबित विषय मंजुरीसाठीशहराचे भूषण असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी अठ्ठावीस महिन्यांपासून करण्यात येत आहे. त्या विषयाला आताच्या सभेमध्ये मंजुरीसाठी घेतल्याने पालिकेच्या प्रशासनाने लवकर आणि चांगला निर्णय घेतला असल्याचे नगरसेवक विनायक पावसकर यांनी सांगितले.