शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख औषधी वनस्पतींची लागवड

By admin | Updated: July 25, 2016 23:35 IST

पाटण वनविभागाचा उपक्रम : वणवा रोखण्यासाठी विद्यार्थी राबविणार जनजागृती...

पाटण : तालुक्यातील पाचगणी, जाळगेवाडी, डेरवण, वेखंडवाडी, खराडवाडी या गावांच्या वनक्षेत्रातील ११६ हेक्टर जमिनीवर या पावसाळ्याच्या हंगामात १ लाख २५ हजार औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.पाटण तालुका दुर्गम व डोंगराळ असला तरी दरवर्षी लागणारे वणवे, वृक्षतोड यामुळे वनक्षेत्र कमी होत चालले आहे. यावर उपाययोजना म्हणून पाटण वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रातील जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी पाचगणी येथील १६ हेक्टर जमिनीवर १६ हजार रोपे, जाळगेवाडी येथे २५ हेक्टरवर २७,५००, डेरवण, वेखंडवाडी, खराडवाडी येथे प्रत्येक २५ हेक्टर जमिनीवर प्रत्येकी २७,५०० रोपांची लागण करण्यात आली आहे. आवळा, बेहडा, हिरडा, दालचिनी, जांभूळ, शिकेकाई, लिंब, हेळा, चिंच, वड, पिंपरण, उंबर, साग, शिवण, ऐन, कुंभा, कांचनचा समावेश आहे. (प्रतिनिधी)नरक्या (अमृता) वनस्पतींची लागवड वनविभागाच्या रासाटी (कोयनानगर) येथे नरक्या या अत्यंत महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची रोपवाटिका करण्यात आली आहे. त्यापैकी २५०० हजार रोपांची लागवड पाचगणी येथील वनक्षेत्रात करण्यात आली आहे. कॅन्सरवर उपयुक्त म्हणून नरक्या (अमृता) वनस्पतींच्या भुकटी (पावडरचा) वापर करण्यात येतो.वनविभागाने लागवड केलेल्या वनस्पतींची वाढ करण्यासाठी वनरक्षक, वनमजूर, वनपाल आदी कर्मचारी व अधिकारी यापुढे सतर्क राहणार आहेत. तसेच उन्हाळ्यात वणव्यांपासून जंगले वाचविण्यासाठी गावोगावी शालेय विद्यार्थ्यांमार्फत वणवा विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.- व्ही. आर. काळे, वनक्षेत्रपाल, पाटण