शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पंचवीस दिवसांनंतर पहिला पोलिस अटकेत !

By admin | Updated: July 16, 2016 23:29 IST

‘सीआयडी’ची कारवाई : सात दिवस कोठडी; इतर बारा जणांचा शोध सुरूच - रावसाहेब जाधव खून प्रकरण

कऱ्हाड : करमाळा येथील रावसाहेब जाधव या संशयिताच्या खून प्रकरणात तब्बल पंचवीस दिवसांनंतर शनिवारी ‘सीआयडी’च्या पथकाने कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील पहिल्या हवालदारास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. कृष्णा खाडे असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. दरम्यान, संशयित रावसाहेब जाधवच्या खून प्रकरणात ‘सीआयडी’ने बाराजणांवर आरोप निश्चीत केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पोलिस निरिक्षक विकास धस, सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी, हवालदार दिलीप क्षीरसागर, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, अतुल देशमुख, नितीन कदम, सुजीत मोहिते, शरद माने, संजय लाटे, अमोल पवार व कृष्णा खाडे यांची नावे आहेत. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल असणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी करमाळा येथील रावसाहेब जाधवला ताब्यात घेतले होते. रावसाहेबसह त्याचा मेहुणा अनिल डिकोळे हासुद्धा पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिस त्या दोघांकडे तपास करीत असताना कार्वेनाका पोलिस चौकीत रावसाहेबची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत अनिल डिकोळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी रावसाहेबला २५ लाखांची मागणी केली होती, असे फिर्यादीत म्हटले होते. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केलेल्या अहवालातही त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याचे व्रण आढळले आहेत. दोन्ही वस्तुस्थितीनुसार ‘सीआयडी’ने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. निलंबनाची कारवाई केल्यानंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी गायब झाले होते. ‘सीआयडी’ने या सर्वांच्या अटकेची रितसर प्रक्रिया सुरू केली होती. अखेर शनिवारी या प्रकरणात ‘सीआयडी’ने हवालदार खाडेला अटक केली.अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरावर छापासत्रपोलिस अधिकाऱ्यांसह एकूण बाराजणांवर रावसाहेबच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ‘सीआयडी’चे पोलिस उपाधीक्षक एन. एस. जगताप यांच्यासह पथक संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेत असून, शुक्रवारीही या पथकाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे टाकले. मात्र, कोणीही पथकाच्या हाती लागले नाही. अशातच शनिवारी कृष्णा खाडे याला पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. कृष्णा एक वर्षापासून पोलिस दलातकृष्णा बाबासाहेब खाडे हा वर्षभरापूर्वीच पोलिस दलात रुजू झाला आहे. रावसाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात असताना खाडे हा बीट मार्शल होता. जाधवच्या मृत्यूच्या आदल्या रात्री तो रात्रगस्तीवर होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, त्याचा या गुन्ह्यात किती सहभाग आहे, याबाबतचा खुलासा अद्याप ‘सीआयडी’कडून करण्यात आलेला नाही. मात्र, या प्रकरणात पहिल्यांदाच खाडेला गजाआड व्हावे लागले आहे.सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुरामुळे बसस्थानकात तोडफोडफलकालाही काळे फासले : शिवसैनिकांवर आरोपसातारा : व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी बसस्थानकातील स्थानक प्रमुख नौशाद तांबोळी यांच्या केबीनची तोडफोड केली. सायंकाळी पुन्हा शिवसैनिकांनी कार्यालयात जाऊन फलकाला काळे फासले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच अटकाव करून शिवसैनिकांना यापासून परावृत्त केले.एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर तांबोळी यांनी आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केल्याचा आरोप करत दहा ते पंधरा शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी तीन वाजता बसस्थानक गाठले. तांबोळी यांच्या कार्यालयात जाऊन खुर्ची व टेबलाची तोडफोड केली. हा प्रकार सुरू झाल्यानंतर तांबोळी तेथून निघून गेले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळाला; परंतु सायंकाळी सहा वाजता पुन्हा शिवसेनेचे किशोर पंडित कार्यकर्त्यांसह तांबोळी यांच्या केबीनमध्ये गेले. तेथे तांबोळी त्यांना सापडले नाहीत; मात्र त्यांच्या नोटीस बोर्डावर त्यांनी काळे फासले. हा प्रकार सुरू असताना तेथे पोलिस आले. पोलिसांनी त्यांच्या हातातील बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या अंगावर काळे डाग पडले. (प्रतिनिधी)नौशाद तांबोळींवर गुन्हा दाखलबसस्थानकात तोडफोड झाल्याचे एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर अनेकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तक्रार कोण देणार, यावर त्यांचे अडून राहिले होते. त्यानंतर एसटी महामंडळातीलच वाहक मंगेश शेलार यांनी तांबोळी यांच्या विरोधात तक्रार दिली. मात्र, ती आक्षेपार्ह्य मजकूर व्हायरल केल्याची.