शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST

सातारा : म्हसवे, (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची ...

सातारा : म्हसवे, (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास म्हसवे येथे उघडकीस आली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने अनेकांची मने हेलावून गेली.

गंगाराम रमेश राठोड (वय १२, रा. म्हसवे, ता. सातारा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगाराम हा मंगळवारी (दि. ५) सायंकाळी घरासमोरून अचानक बेपत्ता झाला. मुलगा बराच वेळ घरी न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे आई ललिता राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली होती.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी म्हसवडे येथील एका उसाच्या शेताजवळ गंगारामचा पायमोजा पडल्याचे त्याच्या घरातल्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ श्वानाला पाचारण केले. श्वान घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला गंगारामच्या पायमोजाचा वास देण्यात आला. श्वान धावतच उसाच्या शेतातून पलीकडच्या शेतात गेले. त्या ठिकाणी गंगारामचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मृतदेहाशेजारी सात ते आठ दगड पडले होते. गंगारामचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मात्र, हा खून नेमका कोणी केला, याचा पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्यासोबत कायम असणाऱ्या त्याच्या १६ वर्षाच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी तो घाबरल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. काही दिवसांपर्वूी गंगाराम आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला होता. त्यावेळी गंगारामने त्याला शिवीगाळ केली. याचा बदला म्हणून त्याने गंगारामचा खून केला.

चौकट :

घटनास्थळाचे चित्र विदारक...

गंगाराम राठोडचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. डोके, तोंड आणि छातीवर दगड मारण्यात आले आहेत. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने म्हसवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.