शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

जखिणवाडीला चार वर्षांत बारा पारितोषिके स्वच्छतेत सातत्य : राज्य स्पर्धेत धडक

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

‘स्वच्छ भारत’ अभियान उत्स्फूर्तपणे

मलकापूर : जखिणवाडी ग्रामस्थांनी महिन्यातील पहिला मंगळवार गावच्या स्वच्छतेसाठी हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे़ स्वच्छतेबाबत सातत्य राखल्यानेच शासनाचे बारा पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत़ तालुक्यातील इतर गावांसाठी त्यांचा उपक्रम प्रेरणादायी आहे़ जखिणवाडी, ता़ कऱ्हाड येथे चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी सरपंच नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या हाती गावाचा कारभार सोपविला़ सदस्यांनी गावात एक-एक करत नवनवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली़ गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणून स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत घेण्यात आला़ त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी दर महिन्यातील पहिला मंगळवार गावाच्या स्वच्छतेसाठी देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी संमती दिली़ हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे़ (प्रतिनिधी)राज्य शासनाची तब्बल बारा पारितोषिके जखिणवाडीने पटकावली आहेत़ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला, तर विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावित राज्यस्तरीय स्वच्छता अभियान स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला आहे़ यशाची शिखरे गाठणाऱ्या गावाचा आदर्श राज्यातील इतर गावांनी घ्यावा़ यासाठी शसनाच्या वतीने जखिणवाडीचा मॉडेल म्हणून उपयोग केला जात आहे़ (प्रतिनिधी)जखिणवाडीला डझनभर पुरस्कार जखिणवाडी गावाने २००९-१० वर्षात ‘निर्मलग्राम’, २०१०-११ या वर्षात सदाशिव खांडके यांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार, २०११-१२ या वर्षात ‘पर्यावरण समृद्ध गाव’, संत गाडगबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम, दिवंगत वसंतराव नाईक पाणी व ‘सांडपाणी व्यवस्थापन’ पुरस्कार व यशवंत पंचायत राज तालुक्यात प्रथम हे पाच पुरस्कार, २०१२-१३ यावर्षी गौरव ग्रामसभेस मानांकन व विकासरत्न पुरस्कार, २०१३-१४ वर्षात संतत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम व पुणे विभागात द्वितीय दोन पुरस्कार तर २०१४-१५ या वर्षात यशवंत पंचायत राज जिल्ह्यात प्रथम क्रमांक असे बारा पुरस्कार मिळवले़ ‘स्वच्छ भारत’ अभियान उत्स्फूर्तपणे जखिणवाडी गावातील ‘स्वच्छ भारत’ अभियानात प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, अविनाश फडतरे, सदाशिव खांडके, चंद्रकांत पारवे, नागेश निकम, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच पांडुरंग कणसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादाराम पाटील, मारुती नलावडे यांच्यासह सर्वांनी सहभाग घेतला़