शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यासह बारा पोलिस निलंबित

By admin | Updated: June 20, 2016 00:43 IST

संशयित मृत्यू प्रकरण : पोलिस अधीक्षकांची कारवाई; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; कऱ्हाडात तणाव

कऱ्हाड : पोलिसांच्या ताब्यातील संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांच्यासह बाराजणांना तडकाफडकी निलंबित केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, मृत रावसाहेब जाधवच्या नातेवाइकांसह शेकडोंचा जमाव रविवारी सकाळपासून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होता. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. चोवीस तासांनंतर (पान १ वरून) रविवारी रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बसमधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. याबाबतचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस या प्रकरणाचे तपासी अधिकारी होते. शुक्रवारी या प्रकरणातील संशयिताबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेला माहिती मिळाली. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह सहा कर्मचारी संशयित रावसाहेब जाधवला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल दशरथ डिकोळे (वय ३६, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेऊन कऱ्हाडात आणले. शनिवारी तपासकामी ते त्या दोघांना घेऊन कार्वे नाका चौकीत गेले होते. त्या ठिकाणी उलटी होऊन प्रकृती खालावल्याने जाधवला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. रावसाहेब जाधव याच्यावर यापूर्वी आंध्रप्रदेश पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही त्याचा हात असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच कर्तव्यातही कसूर केली आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडून केला जात आहे. तपास पथकावरील आरोप ४संशयित रावसाहेब जाधवला कऱ्हाडला आणले त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस रजेवर असतानाही उपस्थित होते. ४रावसाहेब जाधवच्या अंगावर काळे, निळे व्रण आहेत. मात्र, ते मारहाणीमुळेच झालेत का, हे आताच निश्चितपणे सांगता येत नाही. ४रावसाहेब जाधव व अनिल डिकोळे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना त्याबाबत सांगणे गरजेचे होते. मात्र, तसे झालेले नाही. ४ज्या ठिकाणी कारवाई झाली तेथील स्थानिक पोलिसांनाही याबाबत कसलीच कल्पना देण्यात आलेली नाही. ४ संशयित ताब्यात घेतलेल्याची नोंद कऱ्हाडच्या स्टेशन डायरीतही केली गेलेली नाही. महिलांचा पोलिस ठाण्यात आक्रोश ४मृत रावसाहेब जाधव यांच्या नातेवाईक महिलांसह शेकडोंचा जमाव रविवारी सकाळीच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. ४जमावाने पोलिस ठाण्यासमोरच ठाण मांडले. यावेळी उपस्थित महिलांनी मोठा आक्रोश केला होता. ४सकाळी अकरापासून रात्री उशिरापर्यंत महिला एकाच ठिकाणी बसून होत्या.