शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक एकरात बाराशे साग

By admin | Updated: September 7, 2015 20:58 IST

शिक्षकांचा प्रयत्न : ठिबकने देतात पाणी

आदर्की फलटण तालुक्याच्या कायम दुष्काळी भागातील दोन शिक्षकांनी पाणी, मजूर दुष्काळावर मात करीत पर्यावरणाचा विचार करून एका शिक्षकाने एक एकर क्षेत्रात १२०० सागवाणाची झाडे लावली आहेत.फलटण तालुक्यात पावसाची वानवा. भाजीपाला केला, तर मजुराचा प्रश्न यावर मात करीत आदर्की खुर्द येथील दोन शिक्षकांनी सागवण लागवडीचा निर्णय घेतला. त्यापैकी सुनील हरिभाऊ बोडके यांनी जोगमठाच्या पायथ्याशी डोंगराच्या कडेला माळरान क्षेत्राचे सपाटीकरण करून बोरीचे शेत नावाच्या शिवारात आॅस्टेलियन सुपर फास्ट वाणाची १२०० रोपे आणून पाच बाय पाच अशी लागण १४ जून २००८ मध्ये लागण केली व ठिबक सिंचनच्या साह्याने पाणी उन्हाळ्यात द्यावे लागते.गावापासून चार किलोमीटर अंतरावर शेत असल्याने मजुरांना ने-आण करणे. त्यांची रोजंदारी त्याबरोबर घराच्या लोकांना होणारा त्रास कमी झाला. आज सात वर्षांत २० फूट उंच सागवणाची झाडे झाली आहेत. त्यामुळे स्वायत्त उत्पन्न, पर्यावरणाचे संतुलीकरण, पाण्याची बचत झाली. त्यामुळे शिक्षक सुनील बोडके यांना अजून आठ वर्षांनी शाश्वत फायदा होणार आहे. त्यांचे भाऊ बीएस्सी अ‍ॅग्री होऊन एमपीएससी परीक्षा देताना त्यांना पर्यावरणविषयक प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी शेतात सागवणाची लागण केल्याची माहिती दिली. त्यांना चांगले गुण मिळून पीएआयची परीक्षा देऊन ते मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहेत.ज्या शेतकरी वर्गाकडे जमिनी जास्त आहेत, मजूर व भांडवल कमी आहे. त्यांनी हलक्या जमिनीत झाडांची लागण करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा.आम्ही शेतात सागवण लावल्यामुळे मजुरी वाचली, इंधन वाचले घरचे आई व वडिलांचा त्रास वाचला व भावाचे शिक्षण झाले व रोपे सात वर्षांची झाली. आता आठ वर्षांनी पूर्ण वाढ झाल्यानंतर शाश्वत उत्पन्न मिळणार असल्याचे निश्चित आहे.दुष्काळी भाग म्हणून कायम ओरड करण्यापेक्षा मी यावर मात करण्याचे ठरविले. विविध ठिकाणांहून माहिती घेत त्यानुसार शेतीतज्ज्ञांचा सल्ला घेत मी शेती फुलविण्याचा संकल्प केला. या संकल्पाला कुटूंबीय आणि ग्रामस्थांनीही साथ दिली. पहिल्यांदा हे जमेल का अशी धाकधूक होती. आत्मविश्वासाने सामोरे गेलो आणि धरणी माताने मला भरभरून दिले. आज माझी ही शेती सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.- सुनील बोडके