शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

जंगलात बांधलेली बारा घरं जमीनदोस्त

By admin | Updated: December 4, 2014 00:45 IST

महाबळेश्वरात कारवाई : वनविभागाने केली दोघांना अटक; सात वाहने जप्त

महाबळेश्वर : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या देवी चौकाजवळील दाट जंगलात अतिक्रमण करून विनापरवाना उभारलेली बारा घरे येथील विभागीय वन अधिकारी दादासाहेब शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाने आज सकाळी प्रचंड बंदोबस्तात उद्ध्वस्त केली. या प्रकरणी चंद्रकांत ढेबे व चंद्रकांत डोईफोडे या दोघांना अटक करण्यात आली. तसेच दोन चारचाकी ५ दुचाकी अशी एकूण सात वाहनेही वनविभागाने जप्त केली. या धडक कारवाईमुळे या भागात खळबळ उडाली आहे.महाबळेश्वर-सातारा मार्गावर असलेल्या देवी चौकाजवळील सर्व्हे क्रमांक १० मधील घनदाट जंगलात मे महिन्यांत येथील काही लोकांनी अतिक्रमण केले होते. साधारणत: १५ ते २० गुंठे क्षेत्रामध्ये वृक्षतोड करून लोखंडी अँगल व पत्रा वापरून घरे उभारली होती. यासंदर्भात वन विभागाने बारा जणांवर गुन्हा नोंद केला होता व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ५३, ५४ नुसार संबंधितांना नोटीस वली होती. तरीही अतिक्रमण काढण्यात न आल्याने वनविभागाने ही कारवाई केली. या कारवाईत मोकळी दोन ते तीन घरे पाडण्यात आली. मात्र काही घरांमध्ये लोक राहत असल्याने त्या घरांवर कारवाई न करता नोटीस बजावण्यात आली होती. वन विभागाच्या नोटीसमध्ये म्हटले होते की, ‘आपण पुढील काही दिवसांत हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा वनविभागाकडून कारवाई केली जाईल व सर्व माल जप्त करून सरकारजमा करण्यात येईल.’ वन विभागाने केलेल्या आवाहनास येथील लोकांनी प्रतिसाद दिला नाही. उलट तेथे पुन्हा वृक्षतोड करून कूपनलिका काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे वनविभागाने धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी सकाळी कोल्हापूर विभागीय वनसंरक्षक दादासाहेब शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपवनसंरक्षक एन. एम. मोहिते, नीता ढेरे-कट्टे, दीपक खाडे, वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी, पी. डी. बुधनवार, ए. ए. पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, वनपाल, वनरक्षक, ४० पोलीस कर्मचारी व ७० वनकर्मचारी एवढा फौजफाटा घेऊन वनविभागाने कारवाईला प्रारंभ केला.अनेक घरांत राहिणाऱ्या महिला व मुलांना घराबाहेर काढण्यात आले. सामान घराबाहेर काढण्यात आले व जेसीबीच्या साह्याने घरे उद्धस्त करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी तेथे राहणाऱ्या लोकांनी गोंधळ सुरू केला. परंतु बंदोबस्त असल्यामुळे कारवाईत खंड पडला नाही. या कारवाईत नुकतीच खोदलेली कूपनलिका जेसीबीच्या साह्याने उखडून काढण्यात आली. घरासाठी वापरलेले लोखंड, पत्रे हे सर्व सामान वनविभागाने जप्त केले आहे. कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून सर्व लोकांना वनविभागाने ताब्यात घेतले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुपारी सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)