शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:01 IST

मिरज/सातारा/लोणंद : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील दोन रेल्वेस्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून दरोडेखोरांनी तीन एक्स्प्रेस रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना सालपे व आदर्की स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री घडली. या चोरीच्या घटनेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. दहा ते बारा दरोडेखोरांनी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व एलटीटी हुबळी एक्स्प्रेस या तीन ...

मिरज/सातारा/लोणंद : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील दोन रेल्वेस्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून दरोडेखोरांनी तीन एक्स्प्रेस रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना सालपे व आदर्की स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री घडली. या चोरीच्या घटनेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. दहा ते बारा दरोडेखोरांनी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व एलटीटी हुबळी एक्स्प्रेस या तीन रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी सालपे रेल्वेस्थानकाजवळील सिग्नलची वायर कापून कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस व सह्याद्री एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न केला. या गाड्या थांबताच चोरट्यांनी खिडक्यांमधून आत हात घालत प्रवाशांचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. गाडीतील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. मंगळसूत्र महिलेच्या गळ्यात अडकून गाडीतच पडल्याने ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. या गाडीला आरपीएफचा बंदोबस्त असल्याने गाडी थांबताच जवानांनी प्रवाशांना खिडक्या, दरवाजा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. आरपीएफ जवान एम. ए. मोरे व राकेश कुमार यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र दरोडेखोरांनी स्थानकाशेजारील शेतीच्या पिकातून पलायन केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला. या घटनेची माहिती मिळताच सातारा, मिरज आरपीएफ, मिरज रेल्वे पोलीस व लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पोलीस निरीक्षक अजय संसारे, उपनिरीक्षक एच. वाय. पवार, विनोद पवार, एस. डी. माने यांनी परिसरात दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले.घटनास्थळाची पुणे आरपीएफचे उपअधीक्षक मकरारीया यांनी भेट देऊन पाहणी केली. सालपे स्थानकातील घटनेनंतर आदर्की येथे लोकमान्य टिळक टर्मिनसहून हुबळीकडे निघालेली एक्स्प्रेसही सिग्नल वायर कापून अशाच पध्दतीने अडवून चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. या गाडीतील एका प्रवाशास लुटले. या गाडीत कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नसल्याने किती प्रवाशांना लुटले व किती वेळ गाडी थांबली, हे समजू शकले नाही. दरोडेखोरांनी लुटलेल्या बेळगाव येथील प्रवाशाने बेळगाव रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे.तपासासाठी पथकसालपे व आदर्की रेल्वेस्थानकाजवळील सिग्नलची वायर कापून दरोडेखोरांनी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व एलटीटी हुबळी एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न केल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी विभागीय सुरक्षा आयुक्त डी. विकास यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आहे.