खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव हद्दीत कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात कारचा खुळखुळा झाला. अपघातात एक ठार, एक जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास घडला. प्रसन्न पानशेट्टी असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड येथील मिलिंद मोहन वेताळ व प्रसन्न मल्लाप्पा पानशेट्टी हे मुंबईहून कऱ्हाडकडे शनिवार, दि. १३ रोजी रात्री निघाले होते. रात्री नऊच्या सुमारास मारुती (एमएच ०१ वाय ५८४४) भरधाव निघाली होती. यावेळी पुढे निघालेला ट्रकला (एमएच ४६ एआर ७४५९) कारची पाठीमागून जोरात धडक बसली. यामुळे प्रसन्न पानशेट्टी (वय ४५, रा. कऱ्हाड) हे जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर कारचालक मिलिंद वेताळ हे जखमी झाले. पोलिसांनी जखमींना दवाखान्यात पोहोचविले. विजयसिंह बाबर (रा. लोणीवरे, जि. सोलापूर) यांनी पोलिसांत खबर दिली. (प्रतिनिधी)
ट्रकला धडकल्याने कारचा चक्काचूर
By admin | Updated: August 15, 2016 00:55 IST