शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

दिल्ली, मुंबईतीलच खरे देशद्रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना आणि जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. सत्तेनंतर त्यांनी काहीच केले नाही. उलट कारण नसताना पाकिस्तानमधून कांदा आयात करून शेतकºयांचे दर पाडले. आज देशाच्या सिमाही सुरक्षित नाहीत. त्यामुळे दिल्ली व मुंबईत बसलेलेच खरे देशद्रोही असून, ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना आणि जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. सत्तेनंतर त्यांनी काहीच केले नाही. उलट कारण नसताना पाकिस्तानमधून कांदा आयात करून शेतकºयांचे दर पाडले. आज देशाच्या सिमाही सुरक्षित नाहीत. त्यामुळे दिल्ली व मुंबईत बसलेलेच खरे देशद्रोही असून, ते जनतेची फसवणूक करीत आहेत,’ असा घणाघात खासदार राजू शेट्टी यांनी केला.येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित जाहीर शेतकरी मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते.यावेळी मुंबई मार्केट कमिटीचे माजी सभापती डॉ. विजयराव बोरावके, स्वाभिमानीचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडगुले, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, दशरथ फुले, अ‍ॅड. नरसिंह निकम, राजेंद्र भगवान, डॉ. रवींद्र घाडगे, मोरेश्वर जाधव, राजेंद्र ढवण-पाटील, योगेश पांडे, सतीश काकडे, प्रकाश भोंगळे, हणमंतराव शिंदे आदी उपस्थित होते.खासदार शेट्टी म्हणाले, ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अमंलबजावणी करू, शेतकºयांच्या उत्पादीत मालाला चांगला भाव देऊ, असे आश्वासन देत भाजप सरकार केंद्रात आले. तत्पूर्वी, गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ते राज्य प्रगतीपथावर नेले होते. त्यामुळे आम्हीही लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला. बहुमताने हे सरकार सत्तेवर आले. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यांनी शेतकºयांसाठी काहीच केले नाही.’‘निवडणुकीपूर्वी पाकिस्तानच्या नावाने बोलणाºयांनी सत्तेवर येताच पाकिस्तानमधून कांद्याची आवक करून भारतातील शेतकºयांचे दर कोसळवले. या सरकारच्या काळातच देशात आणि राज्यात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. दिल्ली व मुंबईत बसलेले खरे देशद्रोही आहेत,’ असेही शेट्टी यावेळी म्हणाले.खासदार शेट्टी पुढे म्हणाले, ‘शेतकºयांचा सातबारा कोरा व्हावा, स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी आदींबाबत आमचा लढा संपूर्ण भारतात सुरू असून, देशभरातील १२६ संघटनांना एकत्र करून आम्ही संघर्ष सुरू केला आहे. आमच्या संघर्ष यात्रेवर टीका करणाºयांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, कर्जमाफीचे नियम अत्यंत कडक व कठीण असल्याने शेतकºयांचा काहीच फायदा होणार नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत. केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे. हिवाळी अधिवेशनाच्यावेळी दि. २० नोव्हेंबर रोजी जंतरमंतर दिल्ली येथे मोर्चा आणि आंदोलन उभारणारआहे. त्यामुळे शासनाला नक्कीच जाग आल्याशिवाय राहणार नाही.’कर्जमाफी म्हणजे टकल्याला फुकटात तेल...‘आमच्या तीव्र आंदोलनाची आणि शेतकºयांच्या आक्रोशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शेतकºयांसाठी ३४ हजार कोटींची मोठा गाजावाजा करीत कर्जमाफी जाहीर केली. मात्र, यासाठी निकष व अटी कठीण ठेवल्या. यामुळे फायदा कोणालाच होणार नाही. ही कर्जमाफी म्हणजे टक्कल पडलेल्या माणसाला फुकटात तेल व कंगवा देण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी केला. त्याचा काही उपयोग नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत,’ अशी टीकाही खासदार राजू शेट्टी यांनी केली.सातारा जिल्ह्यात संघटनेत व्यापक फेरबदल...सातारा जिल्ह्यातील पक्ष व संघटनवाढीकडे आपण आता लक्ष देणार असून, शेतकºयांच्या प्रश्नांवर जे लढा उभारणार नाहीत त्यांनी घरी बसावे. काहीही कामे न करता नुसता बिल्ला लावणाºयांची आम्हाला गरज नाही, असेही ते म्हणाले.