शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

कुडाळमध्ये तिरंगी, इतर ठिकाणी दुरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

मेढा : जावळी तालुक्यातील ७५ पैकी बारा ग्रामपंचायती पूर्णतः, तर २५ अंशतः बिनविरोध झाली आहे. दुदुस्करवाडी ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज ...

मेढा : जावळी तालुक्यातील ७५ पैकी बारा ग्रामपंचायती पूर्णतः, तर २५ अंशतः बिनविरोध झाली आहे. दुदुस्करवाडी ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या ५४५ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत ११६ जणांनी माघार घेतली असून, ३३९ उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७१४ अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत १७ अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने ७९७ अर्ज शिल्लक राहिले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीत ११६ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने १२ ग्रामपंचायती पूर्णतः, तर २५ ग्रामपंचायतींची अंशतः निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता ३७ ग्रामपंचायतींसाठी २४२ उमेदवार रिंगणात आहेत.

तालुक्यातील कुडाळ, सरताळे, बामणोली तर्फ कुडाळ, बेलावडे, सायगाव, रायगाव, महिगाव या गावातील निवडणूक चुरशीची होणार आहे. कुडाळमध्ये सत्ताधारी वीरेंद्र शिंदे यांच्याविरोधात उपसभापती सौरभ शिंदे या दोन पारंपरिक गटांत लढत होणार आहे. हेमंत शिंदे, संजय शिंदे यांनी आपले पॅनेल उभे केल्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सरताळेत नवले व पवार या दोन गटातच खरी लढत होणार आहे. सायगाव विभागात दीपक पवार व विद्यमान सभापती जयश्री गिरी यांच्या गटांमध्ये चुरस आहे, तर बामणोली तर्फ कुडाळ या ठिकाणी शिवसेनेचे प्रशांत तरडे यांच्याविरुद्ध गावातील दोन पारंपरिक गट एकवटले आहेत. गावातील वाद मिटवून एकोपा टिकावा, यासाठी तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांश ग्रामपंचायतींनी आपली बिनविरोधची परंपरा कायम ठेवून आदर्श निर्माण केला आहे.

कुडाळ, बामणोली तर्फ कुडाळ, सरताळे, बेलावडे, सायगाव, पवारवाडी, रायगाव या ठिकाणी ????????????????

चौकट :

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती

धनकवडी, पिंपरी तर्फ मेढा, करंडी तर्फ मेढा, करंजे, केंजळ, केसकरवाडी, केडंबे, बोंडारवाडी, भूतेघर, आंबेघर तर्फ मेढा, डांगरेघर, मोहाट, म्हाते बुद्रुक, मुकवली, रेंगडेवाडी, वरोशी, गवडी, चोरांबे, दिवदेव, मामुर्डी, आखेगणी, आंबेघर तर्फ कुडाळ, महू, रांजणी, दापवडी, बेलोशी, खर्शी तर्फ कुडाळ, आर्डे, आपटी, कसबे बामणोली, कारगाव, मुनावळे, मौजे शेबडी, उंबरेवाडी, इंदवली तर्फ कुडाळ, करंदी तर्फ कुडाळ.