सातारा : ‘वृक्षारोपण काळाची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संगोपन केले तर त्याचा फायदा अनेक पिढ्यांना निरंतर होईल आणि शहाराच्या सौंदर्यात मोलाची भर पडेल,’ असे विचार नगराध्यक्षा माधवी कदम यांनी मांडले.
सातारा शहरातील प्रभाग ९ मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या. येथील बसाप्पा पेठ आणि त्या पाठीमागील गट नं. ३१६ मधील सर्व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नाने आणि माजी नगरसेविका लता पवार यांच्या प्रेरणेतून नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते २५ झाडे लावण्यात आली. तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्तेही वृक्षारोपण करून त्यांना गौरविण्यात आले.
येथील महिलांनी एक-एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करण्याची ग्वाही नगराध्यक्षांना दिली. लता पवार यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेविका सुनीता पवार व मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती होती.
फोटो आहे... ३०कदम
सातारा शहरातील प्रभाग ९ मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, लता पवार आदींची उपस्थिती होती.