शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

झाड जीपवर कोसळून महिला ठार

By admin | Updated: May 23, 2017 23:20 IST

झाड जीपवर कोसळून महिला ठार

लोकमत न्यूज नेटवर्कतारळे : वादळी वाऱ्यामुळे पिंपरणीचे झाड मोडून पिकअप जीपवर कोसळल्याने नजीकच उभी असलेली एक महिला जागीच ठार झाली. मुरूड, (ता. पाटण) येथे मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. दरम्यान, सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर जीपवरील झाड हटवून संबंधित महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.सोनुबाई शामराव पिंपळे (वय ५०, रा. मालोशी, ता. पाटण) असे दुर्घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड गावाच्या मुख्य चौकात निशिकांत देशमुख यांचे हॉटेल आहे. त्यालगत पुरातन पिंपरणीचे झाड असून, नजीकच जिल्हा परिषद शाळेची भिंत आहे. मंगळवारी दुपारी अचानक वळवाच्या पावसाचे वातावरण तयार झाले. ग्रामस्थ साहित्याची आवराआवर करीत असतानाच वादळी वाऱ्यासह जोरदार त्र आडोशाला गेले. तर सोनुबाई पिंपळे या प्राथमिक शाळेच्या भिंतीलगत उभ्या असलेल्या पिकअप जीपच्या आडोशाला उभ्या राहिल्या. त्याचवेळी देशमुख यांच्या हॉटेलमध्ये दहा ते पंधराजण थांबले होते. अचानक पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याने पिंपरणीच्या झाडातून मोठा आवाज झाला. क्षणार्धात पिंपरणीचे झाड खाली कोसळले. त्याखाली पिकअप जीप व सोनुबाई पिंपळे दबल्या गेल्या. काही वेळात पावसाने उघडीप दिल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. त्यावेळी झाडाखाली अडकलेल्या सोनुबाई यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, झाडाचा घेर जास्त होता. तसेच ते तोडण्यासाठी पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध नव्हती. ग्रामस्थांनी मिळेल त्या कुऱ्हाडीने घाव घालून झाड हटविण्यासाठी प्रयत्न केले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांनी सोनुबाई यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसही त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या दुर्घटनेत पिकअप जीपसह एक दुचाकी व निशिकांत देशमुख यांच्या हॉटेलचे मोठे नुकसान झाले.