वाई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १७ ऑगस्ट १६६६ रोजी झालेल्या आग्राहून सुटकेच्या स्मरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज ॲड. मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा ते राजगड गरूडझेप मोहीम राबविण्यात आली. सुमारे साडेबाराशे किलोमीटरची ही मोहीम फत्ते केली असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही असंख्य शिवप्रेमी सहभागी झाले होते.
दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी
सकाळी साडेसात वाजता आग्र्यातील शिवाजी
महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून व स्थानिक आमदार योगेंद्र
उपाध्याय व इतिहास संशोधक डॉ. सुमन आनंद यांच्या हस्ते राजगडाच्या मातीचे पूजन व शिवज्योत प्रज्वलित करत गरूडझेप मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी शिवज्योत घेऊन
मावळे महाराष्ट्रभूमीत दाखल झाले होते. उत्तर महाराष्ट्रातून मार्गक्रमण
करत मावळे २९ ऑगस्टला राजगडावर पोहोचले. ही मोहीम
शिवज्योत घेऊन २९ ऑगस्ट रोजी राजगडच्या पायथ्याला पाल खिंड येथे पोहोचली. ज्योत महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर पुण्यासह
महाराष्ट्रभरातील जनतेने या मोहिमेतील सर्व मावळ्यांचे मनापासून आदरतिथ्य केले.
महाराजांच्या आग्र्याहून झालेल्या सुटकेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. साधारण तेराशे किलोमीटरचे हे अंतर पार करून दि. २९ रोजी गरूडझेप मोहीम राजगडावर सकाळी साडेअकरा वाजता पोहोचली.
त्यानंतर अभिषेक व स्वागत समारंभ आणि नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोहिमेत मारुती आबा गोळे, कान्होजी जेथे यांचे वंशज दिग्विजय जेधे, जाधव
घराण्याचे वंशज गणेश जाधव व तानाजी माळुसरे यांचे वंशज महेश
मालुसरे यांच्यासह एकूण ७२ मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते. यामध्ये वाई तालुक्यातून ही मावळे सहभागी होण्यासाठी मोहिमेत गेले होते. सातारा जिल्ह्यातून नरवीर पिलाजी गोळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुशांत गोळे, सागर गोळे, अतुल गोळे, भरत गोळे, लौकिक गोळे, स्वप्नील गोळे, विठ्ठल गोळे, आकाश गोळे, सुनील गोळे, प्रसाद पवार उपस्थित होते.
चौकट
शिवमय वातावरण
आदर्की : रणशिंगाची ललकारी.. जय शिवाजी.. जय भवानी.. हर हर महादेव.. हा जयघोष... अशा भारावलेल्या शिवमय वातावरणात शिवशाही पुण्यामध्ये पुनःश्च अवतरली. या आग्रा ते राजगड गरूडझेप मोहिमेचे ठिकठिकाणी स्वागत केले जात होते.
फोटो
आग्र्याहून राजगडला निघालेल्या गरूडझेप मोहिमेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. (छाया : पांडुरंग भिलारे)