शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चढणीच्या माशांवर संक्रांत : प्रजनन खुंटण्याने मासेमारीवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांत गढूळ पाणी असून माशांचा प्रजननाचा काळ सुरू झालाय. हे मासे नदीच्या उलट्या प्रवाहाला लागल्याने ‘चढाचे मासे’ पकडण्यासाठी ग्रामीण भागात खवय्यांचा ठिय्या नदीकाठांवर गळ टाकून आहे. माशांच्या अंडी घालण्याचा हा काळ असल्याने चढाचे मासे न पकडता दोन महिने मासेमारी बंद ठेवली तरच माशांची पैदास वाढून आपणाला वर्षभर मासे पुरणार आहेत. मत्स्यव्यवसाय विभागानेही या दिवसांत मासेमारी न करण्याचे आवाहन केले आहे.

पावसाला नुकतीच सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील नद्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीतील असंख्य मासे प्रजननासाठी उगमाच्या दिशेने उलटा प्रवास सुरु करतात. हा प्रवास सांगताना मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे म्हणाले, ‘डोंगर, झरे, ओहळ, भाताची खाचरे आणि तात्पुरत्या पाणथळ जागेत ते प्रजननासाठी येतात. शांत पाणी पाहून तेथे ते अंडी घालतात व पुन्हा मागे परततात. या अंड्यातून माशांची पिल्ले जन्म घेतात. वर्षातून एकदाच गोड्या पाण्यातील माशांना निसर्ग अंडी घालण्यासाठी संधी देतो आणि पिल्ले संगोपनासाठी वातावरण निर्माण करून देतो.’

नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध, चढाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या माशांना चढाचे किंवा चढणीचे मासे म्हणतात. गोड्या पाण्यातील माशांना प्रजननाची संधी द्यायला हवी. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक सागर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

उथळ पाण्यात अंडी घालण्यासाठी आलेले मासे ही संधी समजून गाव गावातील असंख्य लोक ‘चढणीचे मासे’ पकडतात. माशांच्या प्रजननाचा हा काळ असल्याने हे दोन महिने मासेमारी करु नये, असे आग्रही मत मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, मत्स्याच्या प्रजननावर आपले वर्षभराचे मत्स्यान्न अवलंबून असते. पोटात अंडी असलेले मासे आपण आधीच मारुन टाकले तर आपल्याला चांगले तयार झालेले मासे मिळणार नाहीत.’

चौकट १...

खडशी, वांब, मरळ, मळे हे मासे प्रजननक्षम झालेले असतात. या काळात ते चविष्ट असले तरी मत्स्यप्रेमींना स्वत:च्या चिभेला थोड्या काळासाठी मुरड घालावी लागेल. अन्यथा त्यांच्या प्रजननात अडथळा आणल्यामुळे गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे जलचरांची जिवसाखळी धोक्यात येऊ शकते.

चौकट २

छोटा धबधबा, बंधाऱ्याच्या ठिकाणी हे मासे पाण्याच्या धारेला धरून उंच उडतानाचे दृश्य फारच मनोहारी असते. विशेषत: रात्रीच्या वेळी असे शेकडो मासे प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारताना पाहण्यात वेगळीच मौज आहे. ती अनुभवण्यासाठी मत्स्यप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक रात्रीचा दिवस करत आहेत.

कोट

‘मासेमारी टिकवायची असेल तर पावसाळ्याचे दोन महिने नदीत मासेमारी करु नये. अशी मासेमारी थांबवण्यासाठी शासनस्तरावर विचारविनिमय सुरु आहे. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीतून या दिवसांत मासेमारीसाठी जाऊ नये.’

- अभयसिंह शिंदे इनामदार,

सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय सातारा.

...............