मळाईदेवी संस्थेतील सर्व कर्मचा-यांना सीबीएसचे प्रशिक्षण देण्यात आले. या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अशोकराव थोरात म्हणाले, ग्राहकांना जास्तीतजास्त स्मार्ट सुविधा पुरवण्यासाठी संस्था नेहमीच तत्पर राहिली आहे. बदल हा निसर्गाचा नियम आणि बदलाला सामोरे जाणे, हे आपले काम आहे. या विचाराचा उपयोग करून मळाईदेवी पतसंस्थेने नेहमीच बदल आत्मसात करून आपले कार्य यशस्वी पार पाडले आहे. संस्थेवर सभासदांसह ग्राहकांनी जो आतापर्यंत विश्वास दाखवला, त्या विश्वासाच्या जोरावरच संस्थेने प्रगती केली आहे. म्हणूनच, ग्राहकांना स्मार्ट सुविधा पोहोचवण्यासाठी मळाईदेवी पतसंस्था सीबीएस प्रणालीची सुविधा लवकरच सुरुवात करणार आहे. त्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचा-यांना सीबीएसचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा मळाईदेवी पतसंस्थेचे लेखापरीक्षक गोडबोले तसेच संस्थेच्या अध्यक्ष अरुणादेवी पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. जगामध्ये कोरोनासारख्या आजाराने थैमान घातलेले असताना बँकिंग व्यवसायावर त्याचा आमूलाग्र प्रभाव पडत आहे आणि म्हणूनच मळाईदेवी पतसंस्थेने आपल्या ग्राहकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सीबीएस पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला आहे. (वा. प्र.)