शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र घडविणाऱ्यांच्या संस्थेत शोकांतिका

By admin | Updated: May 8, 2016 00:33 IST

उदयनराजे भोसले : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित कृती समितीच्या उपोषणास पाठिंबा

सातारा : ‘कर्मवीर अण्णांनी बहुजन, उपेक्षित असलेले लोक मोठे व्हावे, या ध्यास विचारांच्या आधारावर रयतेची घटना निर्माण केली. त्यात बदल का केला गेला, हे मला समजत नाही. रयतेची घटना निर्माण झाली त्यावेळी यात राजकारण आणू नये, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आज येथे कोणी राजकारण आणू नये. सर्व शिक्षक आपल्या संस्थेचे आहेत. भले मला संस्थेत स्थान देऊ नका; पण शिक्षकांना त्यांचे स्थान द्यावे,’ असे आवाहन प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. रयतच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित आदी शिक्षकांना सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे, या मागणीसाठी रयत विनाअनुदानित कृती समितीने संस्थेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी खा. उदयनराजे भोसले उपोषणस्थळी आले होते. यावेळी ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, ‘महाराष्ट्राची जडण-घडण करणाऱ्या व्यक्ती या संस्थेत असताना शिक्षकांचा प्रश्न सुटत नाही, ही एक शोकांतिका आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचीच या शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी आहे. कर्मवीरांच्या विचारांना चालना द्यायची असेल तर यांना संस्थेत सामील करून घ्यावे लागेल. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. छ. शिवाजी महाराजांनी ज्या विचारांनी वाटचाल केली, त्याच विचारांनी आम्ही वाटचाल करीत आहोत. राजमाता सुमित्राराजे भोसले यांना कर्मवीरांचे विचार पटले आणि त्यांनी ही संस्था धननीच्या बागेतून सुरू केली. कोणतेही भेदभाव न करता आजपर्यंत या संस्थेचे कामकाज सुरू आहे, अण्णांनी ‘कमवा व शिकवा’ ही योजना जगात प्रथम आणली आणि याच योजनेचा लाभ घेत राजकारण, समाजकारण विविध क्षेत्रांत अनेकजण मोठे झाले आहेत,’ असा टोलाही उदयनराजे यांनी यावेळी लगावला. दरम्यान, शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांविषयी उदयनराजे भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा केली. (प्रतिनिधी)