सचिन काकडे - सातारा -तसे पाहिले तर पर्यटनाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याला मोठा नावलौकिक प्राप्त झाला आहे. आज जिल्ह्यातील पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, काही निवडक पर्यटनस्थळांबरोेबरच अपरिचित पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, ही नव्या आर्थिक विकासाची व स्थानिकांच्या उत्पन्नवाढीची नांदीच ठरली आहे.पर्यटनस्थळ म्हटलं की, महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, कास अशी अनेक नावे सर्वप्रथम समोर येतात. मात्र, या पर्यटनस्थळांबरोबच आता कोयना अभयारण्य, चाफळ, आगाशिवनगर, पाटेश्वर, नागेश्वर, वासोटा, बामणोली अशा अनेक प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेल्या पर्यटनस्थळांना पर्यटक भेटी देत असून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सेवा-सुविधा नसल्याने स्थानिक नागरिक व पर्यटनच्या दृष्टीने या स्थळांचा कसलाच फायदा होत नाही. त्यामुळे ही पर्यटनस्थळे विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. महाबळेश्वर, पाचगणीसारख्या शहरांचे सिने अभिनेत्यांकडून बॅँ्रडिंग केले जात असताना दुसरीककडे मात्र अनेक पर्यटनस्थळे प्रसिद्धीबरोबरच विकासापासूनही वंचित आहेत. मात्र हीच पर्यटनस्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. पर्यटनाबरोबच तीर्थाटनाला येणाऱ्या पर्यटकांचा आलेखही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यातील पाली, पुसेगाव, मांढरदेव, सज्जनगड, औंध अशा अनेक ठिकाणी पर्यटक तीर्थाटनाला येत आहेत. पर्यटनाबरोबच तीर्थाटनाला महत्त्व प्राप्त होत असल्याने पर्यटनस्थळांबरोबच जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास होणे गरजेचे आहे. औद्योगिक विकासात थोडा मागे राहिलेला जिल्हा पर्यटनातून अनेकांना उत्पन्न मिळवून देऊ लागला असून, केवळ सुसूत्रता आणि नियोजनाची गरज असल्याचे २०१४ मध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांचे मत पडले. पाहायला येणारा पर्यटक राहायला आला, तरच पर्यटनातून उत्पन्न, रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथे असणारे गड, किल्ले नेहमीच भुरळ घालतात. मात्र काही ठराविक किल्ले वगळता अन्य किल्यांची दुरवस्थाच पर्यटकांच्या दृष्टिक्षेपास पडले. त्यामुळे पर्यटनाला चालना देणाऱ्या या गड, किल्यांकडे पर्यटक आजही पाठ फिरविताना दिसातात. त्यामुळे पर्यटनासाठी गड, किल्ल्यांचे संवर्धन करणेही तितकेच गरजेचे आहे.शिवाजी संग्रहालयाला मिळेना मुहूर्तछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या सातारा शहरात शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्चून ‘शिवाजी संग्रहालय’ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, गेली तीन-चार वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या वस्तुसंग्रहालयाचा महत्त्व प्राप्त झाले असताना हे काम केव्हा पूर्णत्वास जाईल, हे मात्र निश्चित सांगता येत नाही. शासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुरू उमटू लागले आहेत. त्यामुळे सातारा शहराच्या पर्यटनवाढीसाठी शिवाजी वस्तुसंग्रहालयाचे काम वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे.महाबळेश्वर पालिकेने पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलून यावर्षी एका सिनेअभिनेत्याला महाबळेश्वरचे बॅँ्रड अॅँबॅसेडर केले. परिणामी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. तसेच बारमाही पर्यटन सुरु झाले.
पर्यटकांचा ओघ वाढला
By admin | Updated: December 25, 2014 00:03 IST