शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

फुलांच्या गावी शाळा, महाविद्यालयांच्या सहली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:03 IST

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटक येत आहेत. तसेच पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे असणाऱ्या फुलांच्या गावी अर्थात कास पठारावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली मोठ्या प्रमाणावर भेटी देतआहेत.आत्तापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिलीआहे. दरम्यान, कास-महाबळेश्वर मार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढºया ...

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटक येत आहेत. तसेच पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे असणाऱ्या फुलांच्या गावी अर्थात कास पठारावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली मोठ्या प्रमाणावर भेटी देतआहेत.आत्तापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिलीआहे. दरम्यान, कास-महाबळेश्वर मार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढºया शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी स्वानुभवताना दिसतआहेत. दरम्यान, ड्रॉसेरा हे दुर्मीळ फुलंदेखील पर्यटकांना दर्शन देऊ लागलीआहेत.पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू आहे. ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. जिल्ह्याला लाभलेले कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेºयात कैद करताना दिसत आहेत. काल रविवारी कॉलेज व शाळांना सुटी असल्याने कास पठारारील सौदर्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.कुमुदिनी नायफांडिस इंडिका !महाराष्ट्राच्या पश्चिम भागात काही ठिकाणी छोटी तळी आहेत. तळ्यात पाणी असेल अशा भागात पानभोपळी वनस्पती आढळते. यालाच कुमुदिनी किंवा छोटे कमळ म्हणतात. याचे पान पाण्यावर तरंगते, त्यावर पांढरी केसरयुक्त फुले येतात. याची मुळे पाण्यातून माती भागांपर्यत अन्न घेण्याकरिता तरंगतात. वेल, तणांमार्फत दुसरे रोप तयार होते. उन्हाळ्यात पाणी आटून गेल्यानंतर मुळ्या व कंद जमिनीत सुकतात. पुन्हा पावसाळा आला की जिवंत होतात.कुमुदिनी तलाव हाऊसफुल्ल !कास पठारावर परदेशी पाहुणे देखील येथील फुलांचा नजराणा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. जपान, नॉर्वे आदी देशातील पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील दुर्मीळ फुलांचे कौतुक केले आहे. तसेच तीन किलोमीटर अंतर पायी चालत विदेशी पर्यटकांची पावले कुमुदिनी तलावाकडे वळत आहेत.मोठी गौळण (पोगॅस्टमन डेकनांसिस)सप्टेंबर महिन्यात पाणी साचते व आटते. अशा ठिकाणी ही वनस्पती दिसते. त्यावर लहान पानांमधून तुरा येतो. याची फुले निळसर रंगाच्या तुºयापमाणे असतात. घरातील तुळशीच्या मंजिरी ज्याप्रमाणे दिसतात. त्याप्रमाणे याचे तुरे दिसतात. म्हणून याला निळी मंजिरीदेखील म्हणतात.