शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदसाठी आज मतदान

By admin | Updated: April 17, 2016 00:33 IST

नगरपंचायत निवडणूक : २१ मतदान केंद्रांची निर्मिती; प्रशासन सज्ज; सोमवारी मतमोजणी

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान बदलण्याची ताकद कुणाच्यातही नाही, संविधान बदलण्यासाठी पुढे येणारे हात तोडण्याची ताकद आमच्यात आहे, ज्यांना हे संविधान मान्य नाही, त्यांनी हा देश सोडून जावे, असा इशारा खासदार रामदास आठवले यांनी दिला. रिपब्लिकन पक्षाच्या ‘भारत भीम’ यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे शनिवारी कोल्हापुरात आले होते, यावेळी दसरा चौकात झालेल्या समता महापरिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे होते. खासदार आठवले म्हणाले, देशातील सर्व जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसे जोडणे हा भारत भीमयात्रेचा उद्देश आहे. धर्म, जात, पंथ यावरून होत असलेला संघर्ष थांबावा, या व्यापक विचारासाठी माझा प्रयत्न आहे. देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांच्या पाठीशी आम्ही आहोत, त्यांनी स्वत:ला असुरक्षित समजू नये, असे आवाहन करत, बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी पंतप्रधान झालो असल्याचे नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या मुसलमानांना कोणी धक्का देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही धक्का देऊ, असाही इशारा आठवलेंनी दिला. ‘मनसे’वर हल्लाबोल करताना आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी मराठी माणसांवर जरूर प्रेम करावे पण मुंबई ही सर्व भारतीयांची आहे. त्यामुळे मुंबईत व्यवसाय करणारा हा परप्रांतीय असला तरीही तो भारतीयच आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. ते म्हणाले, रिपाइंमध्ये व्यापक ऐक्य करण्यासाठी सर्व जाती-धर्मांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत. या रिपाइं ऐक्याच्या अध्यक्षपदी आपण प्रकाश आंबेडकर यांनी संमती दिल्यास त्यांची नियुक्ती करू. ऐक्य करा, ताकद वाढवा, पुढे ऐक्यातून नेते फुटले तर त्यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, चंदन शर्मा, बी. एम, चव्हाण, संगीता आठवले यांची भाषणे झाली. यावेळी श्यामप्रसाद कांबळे, बी. के. कांबळे, मंगलराव माळगे, डॉ. अनिल माने, कुमार कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)