शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपग्रस्त दाखल्यांसाठी दमछाक

By admin | Updated: August 8, 2016 23:40 IST

निकषांचे अडथळे : शासकीय नोकरीपासून शेकडो युवक वंचित

सणबूर : कोयना धरण क्षेत्रात १९६७ मध्ये प्रलयकारी भूकंपाने थैमान घातले होते. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. हजारो बेघर झाले. आणि खोरे विशेषत: पाटण तालुक्याच्या विकासाचा आर्थिक कणाच मोडला. त्याचवेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्याचा आर्थिक कणा सावरण्याचा प्रयत्न केला. विविध शासकीय मदतीबरोबर तालुक्याला भूकंपग्रस्त दाखले देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही तेव्हापासूनच घेण्यात आला.लोकनेत्यांनंतर १९९५ पासून पुन्हा हे दाखले राज्य शासनाकडून बंद करण्यात आले. तेव्हापासून तालुक्यातील भूकंपग्रस्त युवकांची फरफट सुरू झाली आहे. तब्बल २० वर्षांनंतर भूकंपग्रस्त दाखले देण्याचा निर्णय राज्यातील युती शासनाने नुकताच जाहीर केला आहे. तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून हा निर्णय राज्य शासनाला घेणे भाग पडले.भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात भूकंपग्रस्त असल्याचा दाखला देण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना प्रदान करण्यात असलेले अधिकार सातारा, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण, फलटण, माण, वाई या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशान्वये शासन सेवेत नियुक्तीसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणामध्ये भूकंपग्रस्तांचा समावेश करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील भूकंपग्रस्त व्यक्तीसाठी शासन सेवेत नियुक्तीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये राज्यातील सर्व भागांतील भूकंपग्रस्त व्यक्तींचा समावेश करण्यात येत आहे. भूकंपग्रस्त दाखला मिळाल्यामुळे पाटण तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे अनेक मुले शासन सेवेत दाखल होण्यास मदत होणार आहे.या आदेशानुसार राज्यातील विविध प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील नातीला प्रकल्पग्रस्त दाखला देण्याविषयीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांनी सून, नातू व नात तसेच प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्या वारसदाराने नामनिर्देशित केलेल्या एका कुटुंब घटकास नोकरीविषयक प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्यात यावे व त्यांना शासकीय नोकरीच्या सवलतीसाठी पात्र ठरविण्यात यावे. असा आदेश देण्यात आला आहे. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत. दाखल्यासाठी तालुक्यातील सुमारे ५५ हजार भूकंपग्रस्त गेल्या २० वर्षांपासून चातकाप्रमाणे वाट पाहत होते. हा दाखला म्हणजे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न होता. (वार्ताहर)