शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यासाठी रानगव्यांवर स्थलांतर करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:15 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा अन्नाच्या शोधार्थ वावर वाढला आहे. कोयना खोरे व महाबळेश्वरसारख्या ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा अन्नाच्या शोधार्थ वावर वाढला आहे. कोयना खोरे व महाबळेश्वरसारख्या दुर्गम भागात आढळून येणारे रानगवे दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच खंडाळा तालुक्यातील पवारवाडीच्या डोंगर परिसरात ग्रामस्थांना आढळून आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.खंडाळा तालुक्यात झपाट्याने बदल होत चालला आहे. डोंगर भागात अतिक्रमण होऊ लागले आहे. त्यामुळे वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात येऊ लागले आहे. जंगल भागातील मानवी शिरकावाने प्राण्यांच्या अडचणीत वाढ झाल्याने अन्नाच्या शोधार्थ आता वन्यजीवांचे मानवी वस्तीत वावर वाढला आहे. पवारवाडी परिसरातील डोंगर पायथ्याला चारच दिवसांपूर्वी दोन रानगवे आढळून आले. रानगवे प्रामुख्याने महाबळेश्वर व कोयना खोऱ्यात दिसून येतात. मागील काही दिवसांपासून खंडाळा तालुक्याच्या दक्षिण-पश्चिम डोंगरमाथ्याला दिसून आल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.पवारवाडीतील रानगव्यांचे वास्तव्य, असवली परिसरात रानडुकरांचा होणारा त्रास, मानवी वस्तीत घुसून लांडग्यांनी फस्त केलेल्या शेळ्या, गतवर्षी मोर्वे, वाठार बुद्रुक, अंदोरी या ऊस पट्ट्याच्या परिसरात आढळलेला बिबट्या, हरळी येथील विहिरीत पडलेले भेकर, कण्हेर धरणाच्या बाहेर आढळलेली मगर, पाटणच्या खोºयात आढळलेला मोठा अजगर याशिवाय अन्य काही वन्यप्राण्यांविषयी समोर आलेल्या घटना त्यांचे जंगलातील अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आणून देत आहेत. अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.