शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कमळावर घड्याळाची टिकटिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक ३0 जागांवर भलतीच वाजली, तर राष्ट्रवादीशी घरोबा करून भाजपने तब्बल चार जागांवर कमळ फुलविले. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शंभूराजे यांचा वारू या दोन्ही पक्षांनी ताकदीने रोखल्याचे मतमोजणीनंतर समोर आले.नगरपंचायत व नगरपालिका या दोन मतदारसंघातील सातही जागा राष्ट्रवादीने काबीज ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक ३0 जागांवर भलतीच वाजली, तर राष्ट्रवादीशी घरोबा करून भाजपने तब्बल चार जागांवर कमळ फुलविले. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शंभूराजे यांचा वारू या दोन्ही पक्षांनी ताकदीने रोखल्याचे मतमोजणीनंतर समोर आले.नगरपंचायत व नगरपालिका या दोन मतदारसंघातील सातही जागा राष्ट्रवादीने काबीज केल्या. राष्ट्रवादीने ४0 जागांपैकी ३0 जागा आपल्या पारड्यात खेचून आणल्या. राष्ट्रवादीच्या सहकार्यामुळे भाजपला चार जागा मिळाल्या. जिल्हा परिषदेत अवघे सात इतके कमी संख्याबळ असणाºया काँगे्रसने तब्बल पाच जागांवर आश्चर्यकारकरित्या विजय मिळविला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मंगेश धुमाळ, शिवाजीराव चव्हाण, रमेश पाटील, मानसिंगराव जगदाळे, उदय कबुले, बाबासोा पवार, बापू जाधव, उषादेवी गावडे, भारती पोळ, जयश्री फाळके, संगीता मस्कर, अर्चना रांजणे, दीपाली साळुंखे, संगीता खबाले-पाटील, विनीता पलंगे यांनी विजय मिळविला. इतर मागास प्रवर्गात राष्ट्रवादीने आठ जागा यापूर्वी बिनविरोध मिळविल्या होत्या. तर काँगे्रसच्या अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, निवास थोरात, सुनिता कदम यांनी विजय मिळविला. काँगे्रसला या मतदारसंघात यापूर्वी दोन जागा बिनविरोध मिळाल्या होत्या. भाजपच्या मनोज घोरपडे, सुवर्णा देसाई, रेश्मा शिंदे यांनी विजय मिळविला. तसेच भाजपला यापूर्वीच एक जागा बिनविरोध मिळाली होती. सातारा विकास आघाडीच्या अर्चना देशमुख या एकमेव उमेदवार विजयी झाल्या.दरम्यान, नगरपंचायत मतदारसंघातील दोन जागांवर शोभा माळी, संजय पिसाळ यांनी विजय मिळविला. नगरपालिका मतदारसंघात राष्ट्रवादीचे विनोद उर्फ बाळू खंदारे, लीना गोरे, आनंदा कोरे, पल्लवी पवार, चरण गायकवाड हे पाच उमेदवार विजयी झाले.पराभूत दीपाली साळुंखे विजयीजिल्हा परिषद मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागेची मतमोजणी झाली. त्यात राष्ट्रवादीच्या दीपाली साळुंखे व सातारा विकास आघाडीच्या अनिता चोरगे यांना दोन फेºयांत सारखी मते पडल्याचे स्पष्ट करीत चिठ्ठीचा प्रयोग करून साळुंखे यांना पराभूत घोषित केले.राष्ट्रवादीच्या सुरेंद्र गुदगे, राजकुमार पाटील, श्रीनिवास शिंदे यांनी याबाबत हरकत नोंदवित पुन्हा मोजणीचा आग्रह धरला, त्यात दीपाली साळुंखे विजयी ठरल्या.