शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचे तांडव; वीज कोसळून शेतकरी ठार

By admin | Updated: June 4, 2016 00:41 IST

दुसऱ्या दिवशीही सर्वदूर रिपरिप : औंधला बंधाऱ्यात पाणी; फलटणला ५१ मिमीची नोंद

फलटण/तरडगाव : फलटण शहर व तालुक्यात गुरुवारी सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह पावासाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी कापडगाव हद्दीत शेतातून घरी गुरे घेऊन येत असताना सोमनाथ उत्तम चतुर (वय ४०, रा. कापडगाव) हे वीज अंगावर पडल्याने ठार झाले. गुरुवारी सायंकाळनंतर तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी झाडे कोसळून पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. फलटण शहरात अधिक पाऊस झाला. त्यामुळे फलटण-पंढरपूर रस्त्यावर गोविंद डेअरीजवळ ओढ्याला पाणी आले. परिणामी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. वाई : वाई शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसाच्या आगमनामुळे पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे. वाई तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते. पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात गुरुवारी सायंकाळी तुरळक तर रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने तासभर हजेरी लावली. हा पाऊस भाताच्या पेरणीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे कास तलावाच्या पातळीत कोणत्याही स्वरूपात वाढ झालेली नाही. मसूर : मसूर परिसरात विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. किवळ येथे वीज वाहिनीचा धक्का लागून शेळ्यांसह म्हशीचा व कुत्र्याचा मृत्यू झाला. केळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह पावसामुळे दूरसंचाार विभागाची यंत्रणाही कोलमडली.मसूर मंडलअधिकारी के. टी. वाघमारे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वाऱ्यामुळे खराडे येथे दोन विजेचे खांब दुसऱ्यांदा जमीनदोस्त झाल्याची घटना घडली. शेंद्रे : शेंद्रे परिसरात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. फांद्या वीजवाहिनीवर पडल्याने सुमारे २० तास वीजपुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळासह झालेल्या या पावसामुळे नुकसानीच्याही घटना घडल्या आहेत. फलटण तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाला. कऱ्हाड तालुक्यात वीज वाहिनीचा धक्का लागून शेळ्यांसह म्हैस मृत्युमुखी पडली. फलटण शहरात सर्वाधिक ५१ मिमी पाऊस झाला. औंध परिसरात ओढे, नाले वाहू लागले. वाई तालुक्यात तर पावसामुळे मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. कास परिसरात भात रोपे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस झाला.