शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खांद्यावरून पाणी आणून आजोबा भागावताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:56 IST

कुकुडवाड : वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावात श्रमदान सुरू असून, गाव पाणीदार होताना आपणही त्यामध्ये साक्षीदार राहावे, यासाठी वृद्धही मागे नाहीत. याच भावनेतून माण तालुक्यातील चिलारवाडीत ८५ आणि ९५ वयाचे आजोबा श्रमदान करणाऱ्यांची तहान भागविण्यासाठी धडपड करीत आहेत.माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धें तर्गत अनेक गावांत काम सुरू आहे. अनेकजण ...

कुकुडवाड : वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावात श्रमदान सुरू असून, गाव पाणीदार होताना आपणही त्यामध्ये साक्षीदार राहावे, यासाठी वृद्धही मागे नाहीत. याच भावनेतून माण तालुक्यातील चिलारवाडीत ८५ आणि ९५ वयाचे आजोबा श्रमदान करणाऱ्यांची तहान भागविण्यासाठी धडपड करीत आहेत.माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धेंतर्गत अनेक गावांत काम सुरू आहे. अनेकजण हातात फावडे, टिकाव, पाटी घेऊन श्रमदान करतात; पण काहीजण हातात फावडे, टिकाव किंवा पाटी न घेता श्रमदान करत आहेत. तर काहीजण वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहेत.तालुक्यातील चिलारवाडी गावातील ८५ वर्षांचे नाना रामा झुरळे व ९५ वय असणारे शंकर रामा घुटुकडे हे दोन आजोबा काठीचा आधार घेऊन पाणी आणत आहेत. खांद्यावर कळशी घेऊन पाणी आणत ते श्रमदान करणाºयांची तहान भागवत आहेत. त्यामुळे श्रमदान करणाºयांचाही उत्साह वाढत आहे.तरुणांपुढे वृद्धांचा आदर्श...कुकुडवाडजवळ चिलारवाडी हे एक छोटंसं गाव आहे. हे गाव पाणीदार होण्यासाठी येथील तरुण वर्ग, पुरुष, महिला, वृद्ध लोक श्रमदान करत आहेत.काहीजण पिण्याचे पाणी श्रमदान करणाºयांना पुरवत आहेत. त्यामुळे येथील तरुणवर्ग वृद्धांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रमदान करत आहेत.