शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

खुणावतोय ओझर्डेचा रोमांचकारी जलप्रपात

By admin | Updated: June 22, 2015 23:06 IST

पाटण तालुका : पर्यटकांना पावसाळी सहलीची संधी; छोटे धबधबेही कोसळू लागले

पाटण : पावसाळ्यातील स्वस्त आणि मस्त पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी एकदिवसीय सहलीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पर्यटकांचे आकर्षण असलेला आझर्डेचा धबधबा कोसळू लागला आहे. कोयना परिसरात गेले तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे कोयना अभयारण्यातील ओझर्डे धबधबा व त्या मार्गावरील इतर छोटे-मोठे धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी पावसाळी सहलीची संधी निर्माण झाली आहे.कोयनानगरपासून नवजाकडे जाताना ओझर्डे धबधबा पाहता येतो. अभयारण्यात अत्यंत उंचावरून कोसळणारा जलप्रपात अंगावर रोमांच उभे करत आहे. या धबधब्यातून तीन मोठे प्रवाह कोसळतात त्यामुळे हे दृश्य अधिक विलोभनीय दिसते. ओझर्डे येथील हा धबधबा पाहण्यासाठी जिल्ह्यातील तसेच बाहेरील पर्यटक, युवक मोठी गर्दी करतात. सध्या हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला नसला तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच तो पूर्ण क्षमतेने कोसळू लागेल. (प्रतिनिधी) वीजनिर्मितीचा मानस...कोयना अभयारण्यातील या उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा मानस जलसंपदा विभागाचा आहे. वन्यजीव विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या ओझर्डे धबधब्याचा आर्थिक फायदा कोयना येथील काही खासगी व्यक्ती व संस्था घेत असून पर्यटकांपासून नियमबाह्य पैसे उकळ्याचा प्रकार बंद झाला पाहिजे, यासाठी वन्यजीव विभाग व पोलीस यंत्रणेने स्वत:चे अधिकार वापरून धबधब्याजवळ चालणारी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे. धबधब्यात उतरू नयेओझर्डे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना सुमारे वीस मिनिटे चालून डोंगर चढावा लागतो. त्याठिकाणी गेल्यानंतर लांबून धबधबा पाहता येतो. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक धबधब्यात उतरून धोका पत्करतात. पर्यटकांनी धोकादायक धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.