शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शितकडा धबधब्यावर रॅपलिंगचा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST

सातारा : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव यांनी नाशिक जिल्ह्यातील शितकडा धबधब्यावरील तब्बल ३५० ...

सातारा : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव यांनी नाशिक जिल्ह्यातील शितकडा धबधब्यावरील तब्बल ३५० फुटांच्या रॅपलिंगचा थरार सुरक्षितपणे अनुभवला. त्यानंतर तिरंगा फडकावित ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा केला.

या मोहिमेची सुरुवात उंभ्रांडे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) गावापासून सुरू झाली. अर्ध्या तासाची पायपीट करून नदीपात्र ओलांडला की शितकडा धबधबा येतो. पहिला दहा फुटी खडकाळ टप्पा संपल्यानंतर धबधब्याचे मनात धडकी भरवणारे रौद्ररूप दिसते. रॅपलिंगच्या उतार झाल्यावर कड्यावर चित्तथरारक अनुभूतीसाठी या ठिकाणी चेहरा खडकाच्या दिशेने आणि पाठ दरीच्या दिशेने करून शरीरावर दोरीच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून दरीच्या दिशेने झुकावे लागते. पहिला १०० फुटांचा टप्पा पार करताना हातातील दोरी वरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते. शेवटचा ८० फुटांचा टप्पा हा धबधब्याच्या पाण्यातून गेल्याने रॅपलिंगचा हा अनुभव चित्तथरारक ठरतो.

अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात साताऱ्याचे गिर्यारोहक रोहित जाधव, जळगावमधील प्रदीप बारी आणि नाशिक येथील दर्शन कापडणीस या गिर्यारोहकांनी टीम पॉइंट ब्रेक अ‍ॅॅडव्हेंचर्सच्या (नाशिक) चेतन शिंदे, जॉकी साळुंखे, चेतन बेंडकोळी, अमोल तेलंग, सौरव भगत, अर्चना गडदे या गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे मोहीम फत्ते केली.

(चौकट)

आव्हानांचा सामना करत मोहीम फत्ते!

तब्बल ३५० फुटांचे चित्तथरारक रॅपलिंग, धुक्यात हरवलेला परिसर, मुसळधार पाऊस, ओले कातळकडे, निसरडी पाऊलवाट, शेवाळलेले खडक, हुडहुडी भरवणारी थंडी, कधी दोरीच्या साह्याने तर कधी काठीच्या साह्याने एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे नदीपात्र ओलांडणे, अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.

(चौकट)

मोहीम जवान अन् खेळाडूंना समर्पित

ही धाडसी मोहीम सांगली-कोल्हापूर-चिपळूण या पूरग्रस्त भागातील नागरिकांचे प्राण वाचविणारे एनडीआरएफचे जवान आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी आपल्या भारत देशाला पदक मिळवून दिली अशा सर्व खेळाडूंना समर्पित केल्याचे रोहित जाधव यांनी सांगितले.

फोटो : १६ शितकडा रॅपलिंग

गिर्यारोहक रोहित जाधव यांनी शितकडा धबधब्यावर रॅपलिंगचा थरार अनुभवला. यानंतर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यदिनही साजरा केला.