शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पोवई नाक्यावर तीन तरुणांचा सशस्त्र धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:47 IST

सातारा : दुचाकी धडकल्याच्या रागातून येथील पोवई नाक्यावर तरुणांनी हातात गुप्ती घेऊन धिंगाणा घातला. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही अटक केली. या घटनेमुळे पोवई नाका परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.परशुराम उत्तम जाधव (वय २३), जीवन संजय पवार (२२ दोघे रा. ...

सातारा : दुचाकी धडकल्याच्या रागातून येथील पोवई नाक्यावर तरुणांनी हातात गुप्ती घेऊन धिंगाणा घातला. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही अटक केली. या घटनेमुळे पोवई नाका परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.परशुराम उत्तम जाधव (वय २३), जीवन संजय पवार (२२ दोघे रा. रविवार पेठ, सातारा), सनी अशोक काटकर (२४, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोवई नाक्यावरील बढीया पेट्रोलपंपासमोरून हे तिघे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुसºया दुचाकीस्वाराची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या तिघांनी त्या दुचाकीस्वारासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक वादावादी वाढल्यानंतर या तिघांपैकी एकाने कमरेला दडवलेली गुप्ती बाहेर काढली. काही वेळ गुप्ती हातात धरून त्यांनी दहशत माजवली. त्यामुळे हा प्रकार पाहणारे नागरिकही भयभीत झाले. भर वर्दळीच्या ठिकाणी युवक हातात शस्त्र घेऊन धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुप्ती जप्त केली. तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आर्म अ‍ॅक्टनुसार तिघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याची फिर्याद स्वत: पोलिसांनी दिली आहे.पोलिसांकडून खातरजमाअटक केलेले तिघे मद्यधुंद अवस्थेत होते, असे पोलिसांनी सांगितले. या तिघांपैकी एकाने नेमकी गुप्ती कशासाठी स्वत:जवळ ठेवली होती, याची पोलीस चौकशी करीत आहेत. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? याचीही पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे.