शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

तीन वर्षांनंतर करतात गणेशमूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:02 IST

जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सुखकर्ता तू दुखहर्ता ही गणरायाची ओळख. याला साजेसे काम साताऱ्यातील कृष्णेश्वर ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सुखकर्ता तू दुखहर्ता ही गणरायाची ओळख. याला साजेसे काम साताऱ्यातील कृष्णेश्वर पार गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत. महाकाय गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यामुळे होणारे जलप्रदूषण लक्षात घेऊन मंडळाने एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तीन वर्षे विसर्जित करायची नाही. त्याऐवजी छोट्या मूर्तीचे विसर्जन करायचे, असा निर्णय घेतला. ही परंपरा मंडळाने यंदाही जपली आहे.व्यंकटपुरा पेठेतील या मंडळाची स्थापना १९६० मध्ये झाली. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते समाजाला दिशादर्शक काम करत आहेत. विसर्जन मिरवणूक म्हटल्यावर कर्णकर्कश ध्वनिक्षेपक लावून मनसोक्त थिरकावे, असे तरुणांना वाटत असते; पण या मंडळाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी नव्या पिढीवर समाजकारणाचे संस्कार केले आहेत. त्यामुळेच कर्णकर्कश आवाज करणाºया वाद्यांना छेद देऊन पारंपरिक वाद्य स्वीकारणे सोपे गेले. जलप्रदूषणाएवढेच वायू प्रदूषण महत्त्वाचे आहे. ते टाळण्यासाठी गुलालविरहित मिरवणूक काढली जाते.गेल्या महिन्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत आलेल्या महापुरामुळे हजारो ट्रक चालक अडकून पडले होते. त्यांच्यासाठी मंडळाने जेवणाची सोय केली होती. याबरोबरच व्यंकटपुरा पेठेत मुलांसाठी विविध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गौरी सजावट स्पर्धा, दहीहंडी आदी उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संजय पवार, संजय ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बोलेमामाच्याकुटुंबाला मदतकाही वर्षांपूर्वी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत भिंत पडल्यामुळे अनेकांचा बळी गेला. त्यावेळी बोलेमामाच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ‘लोकमत’ने मोहीम हाती घेतली होती. त्यातही सहभागी होऊन या गणेश मंडळाने मदतीचा हात पुढे केला होता. मंडळाने यंदा घरोघरी जाऊन ‘प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका,’ असा आग्रह धरत कापडी पिशव्यांचे वाटप केले.