शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिला डॉक्टरांचा साताऱ्यात विनयभंग : महाबळेश्वरातही गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:19 IST

सातारा/महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील डॉक्टरकडून रुग्ण महिलेचा तर साताऱ्यातील तीन शिकाऊ डॉक्टरांचा भर

ठळक मुद्देतपासणीसाठी आलेल्या महिलेचीही फिर्याद

सातारा/महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील डॉक्टरकडून रुग्ण महिलेचा तर साताऱ्यातील तीन शिकाऊ डॉक्टरांचा भर रस्त्यात पाठलाग करत हात धरल्याची घटना घडली. सातारा शहरमध्ये रमेश दुज्जा मुल्ला (अमरलक्ष्मी देगाव, ता. सातारा) व महाबळेश्वरमध्ये डॉक्टर भांगडिया यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी महिला व तिची मैत्रीण अशा दोघी मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील एका सामाजिक संस्थेमार्फत वर्गणी गोळा करत होत्या. दरम्यान, फिर्यादी महिलेच्या पोटात अचानक दुखू लागले. महिलाही तानूू पटेल स्ट्रीट येथील डॉ. भांगडिया यांच्या दवाखान्यात गेल्या. त्यावेळी दवाखान्यात डॉक्टर व कंपाउंडर हे दोघेच उपस्थित होते. डॉक्टरांनी महिलेच्या मैत्रिणीला बाहेर थांबायला सांगितले. तर कंपाऊंडरला बाहेर तिकीट आणण्यास सांगितले.

दरम्यान, तपासणी करत असताना डॉक्टराने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तद्नंतर डॉक्टरांनी कागदावर औषधे लिहून दिली व पैसे देत असताना त्यांनी पैसे घेतले नाहीत. घडलेला प्रकार बाहेर आल्यावर सोबत असलेल्या महिलेस सांगितला व महाबळेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. भांगडिया याच्याविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस नाईक सुनीता डोईफोडे करीत आहेत.तर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतात. ड्युटी संपल्याने घरी जात असताना मुथा कॉलनी रस्त्यावर रमेश मुल्ला हा नेहमी दुचाकीवरून येत पाठलाग करत असतो. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रमेश दुचाकीवर आला.

दुचाकी आडवी मारून डॉक्टर तरुणीचा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तर दोन्ही शिकाऊ डॉक्टरांचा पाठलाग करत अश्लील हावभाव करत होता. याप्रकरणी तिन्ही शिकाऊ डॉक्टरांनी स्वतंत्र तीन फिर्याद दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रमेश मुल्ला याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वंजारी करीत आहेत.वैद्यकीय क्षेत्रात खळबळमहाबळेश्वर येथील डॉ. नंदकिशोर भांगडिया यांची प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वरात ते स्वत:च्या दवाखान्यातून रुग्णसेवा बजावत आहेत. डॉक्टरी पेशा सांभाळत असतानाच त्यांनी २०११ ते २०१६ या कालावधीत महाबळेश्वर गिरिस्थान पालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. डॉ. भांगडिया यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.