शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातून तीन हजार वकीलपत्रे

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

सांगली आघाडीवर : तीनशे प्रतिकात्मक वकीलपत्रे न्यायालयात सादर

सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पानसरे कुटुंब व शासन यांच्यावतीने वकीलपत्र घेण्यासाठी राज्यातील सुमारे तीन हजार वकील पुढे आले आहेत. त्यांनी वकीलपत्र घेतल्याची कागदपत्रे सह्या करून कोल्हापुरातील वकील संघटनेकडे सादर केली आहेत. वकीलपत्र घेण्यासाठी सांगलीतून सुरुवात झाली होती. शुक्रवारी शंभरजणांनी वकीलपत्र घेतले आहे. यात शनिवारी वाढ झाली. तब्बल पाचशे वकिलांनी याप्रकरणी सहभाग नोंदविला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वकीलपत्र न्यायालयात सादर करणे शक्य नसल्याने प्रतिकात्मक वकीलपत्र कोल्हापुरातील न्यायालयात सादर केले आहे. पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात न्यायालयात उभे केले होते. त्यावेळी सनातन संस्थेने गायकवाडच्या बाजूने ३१ वकिलांची फौज उभी केली होती. ‘सनातन’ला आव्हान देण्यासाठी सांगलीतील अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, अ‍ॅड. अमित शिंदे यांनी पुढाकार घेतला. पानसरे कुटुंब व शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी त्यांनी वकिलांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात त्यांनी शुक्रवारी केली होती. पहिल्या दिवशी सांगलीतून शंभर वकील पुढे आले होते. शनिवारी यात वाढ झाली. तब्बल चारशे वकिलांनी अ‍ॅड. अमित शिंदे यांच्याशी संपर्क साधून आम्ही पानसरे यांचे वकीलपत्र घेत असल्याचे सांगून कागदपत्रे सह्या करून दिली. सांगलीतून तब्बल पाचशे वकिलांची वकीलपत्रे आली आहेत. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, अकोलासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून तीन हजार वकील पुढे आले आहेत. या सर्वांनी वकीलपत्र घेतले असल्याची कागदपत्रे सह्या करून कोल्हापुरातील वकील संघटनेला सादर केली आहेत. एवढी सगळी वकीलपत्रे न्यायालयात सादर करणे शक्य नाही. त्यामुळे केवळ तीनशे प्रतिकात्मक वकीलपत्रे न्यायालयात सादर केली. यामध्ये सांगलीतील दीडशे व कोल्हापुरात दीडशे वकीलपत्रांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) वकीलपत्र घेण्याच्या मोहिमेला राज्यातून वकिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दीड-दोनशे वकिलांनी वकीलपत्र घेतले आहे. अजूनही अनेक वकील संपर्क साधत आहेत. न्यायप्रकियेत पानसरे कुटुंबास सर्वतोपरी मदत केली जाईल. - अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली.