शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटींना, तर ठाणे-भिवंडी या आठपदरी बायपास रस्त्याच्या एक हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. महिन्यात निविदा व तीन महिन्यांच्या आत हे काम सुरू करण्याचे ...

ठळक मुद्देस्ते व परिवहनविषयक कामांबाबत आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटींना, तर ठाणे-भिवंडी या आठपदरी बायपास रस्त्याच्या एक हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. महिन्यात निविदा व तीन महिन्यांच्या आत हे काम सुरू करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले.परिवहन भवन येथे गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते व परिवहनविषयक कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर श्री. गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. बैठकीस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, राज्यातील खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि केंद्रीय रस्तेवाहतूक विभागाचे सचिव युधवीरसिंह मलिक तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील रस्त्यांच्या ३० हजार कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्यत्वे सातारा-कागल (कोल्हापूर) हा चौपदरी रस्ता सहापदरी करण्यात येणार असून, या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगती दूर करण्यात आली. या रस्त्याच्या बांधकामासाठी तीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येतील आणि तीन महिन्यांत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.----- बास्केट ब्रीजचे काम सुरु करा : महाडिकया बैठकीत कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रीजची बांधणी तातडीने सुरु करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. नागपूर-रत्नागिरी महामार्ग कोल्हापूर शहरातून प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येईल. त्यासाठी शिरोली नाका ते शिवाजी पुल या मार्गावर नवीन उड्डाण पूल उभारण्यात यावा असेही महाडिक यांनी सुचविले.