शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मसूरमध्ये तीन एटीएम चोरट्यांनी रात्रीत फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:51 IST

मसूर : येथील मुख्य चौकातील तीन एटीएम चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडली. त्यातील दोन मशीनमधून सुमारे एक लाखाची रोकड लंपास करण्यात आली आहे. तर तिसऱ्या मशीनबाबत बँकेकडून खातरजमा झाली नसल्याने किती रक्कम चोरीला गेली, हे स्पष्ट झाले नव्हते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मसूरमध्ये वेगवेगळ्या बँकांची एकूण चार ...

मसूर : येथील मुख्य चौकातील तीन एटीएम चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडली. त्यातील दोन मशीनमधून सुमारे एक लाखाची रोकड लंपास करण्यात आली आहे. तर तिसऱ्या मशीनबाबत बँकेकडून खातरजमा झाली नसल्याने किती रक्कम चोरीला गेली, हे स्पष्ट झाले नव्हते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मसूरमध्ये वेगवेगळ्या बँकांची एकूण चार एटीएम सेंटर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कºहाड अर्बन बँक या बँकांच्या एटीएमचा समावेश आहे. अर्बन बँकेच्या शाखेजवळच त्यांचे एटीएम सेंटर आहे. याठिकाणी नेहमी पहारा देण्यासाठी एक सुरक्षारक्षक असतो. तर इतर दोन बँकांची एटीएम त्या-त्या बँकेच्या शाखेपासून काही अंतरावर आहेत.मसूर-उंब्रज रस्त्यावर युवराज पाटील चौकानजीक महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. तर याच रस्त्यावर स्टँड चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. कºहाड-मसूर रस्त्यावर अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तिन्ही ठिकाणची एटीएम फोडली. प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही चोरट्यांनी फोडले आहेत. एटीएम मशीनमध्ये कोणत्या तरी लोखंडी वस्तूने प्रहार करून मशीन फोडण्यात आलेली आहेत. परंतु चोरट्यांना मशीनमधील सर्व रक्कम काढता आली नाही.मंगळवारी रात्री मसूरमध्ये जोरदार पाऊस होता. त्यामुळे सगळीकडे सामसूम होते. उंब्रज-मसूर आणि कºहाड-मसूर रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ चालू असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी या चोरी झाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयडीबीआय बँकेच्या एटीएमजवळ लोकवस्ती आहे. परंतु याठिकाणी कोणताही आवाज न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्यांनी प्रत्येक एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत आणि मशीनचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी प्रत्येक ठिकाणी भेट देऊन कर्मचाºयांना तपासकामी सूचना दिल्या. पोलिसांनी याठिकाणी घटनेचा तपास लावण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. पावसामुळे चिखल झाल्याने श्वानपथकाला माग काढता आला नाही तर ठसे तज्ज्ञांना काही ठिकाणी ठसे मिळून आले आहेत.चोरट्यांना मिळाली आयती संधीमसूर पोलीस दूरक्षेत्रातील एक कर्मचारी नेहमी रात्रपाळीसाठी चौकात असतो. परंतु मंगळवारी रात्री रात्रपाळीसाठी कोणताही कर्मचारी चौकात उपस्थित नसल्याची चर्चा ग्रामस्थांमधून सुरू होती. ज्या ठिकाणी रात्रपाळीसाठी कर्मचारी रात्रगस्त घालत असतात, त्या ठिकाणाहून आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटर व अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर दिसतात. मात्र, पोलीस कर्मचारीच उपस्थित नसल्याने चोरट्यांना आयतीच संधी मिळाली, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.