महाबळेश्वर : झांजवड गावात राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी तथाकथीत पुढारी हे शासकिय कर्मचारी यांना हाताशी धरून गावाच्या विकास कामामध्ये अडथळा आणतात. गावातील लोकांना दमदाटी करणे शिवीगाळ करणे दबाव टाकुन आवाज दाबणे अशी उर्मट वागणुक देवुन गावाला वेठीस धरून दहशत माजवितात. या दहशती विरोधात गावकऱ्यांनी महाबळेश्वर पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंचासह तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. तथाकथित नेत्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा इशाराही गावाने दिला आहे.झांजवड ता. महाबळेश्वर हे साधारण तीनशे लोकवस्तीचे गाव या गावात ग्रामपंचायतीमध्ये पाच सदस्य आहे. तर दोन जागा रिक्त आहेत. या गावाच्या विकासाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी कायम दुर्लक्ष केले तरीही आज नाहीतर उद्या विकास कामे होतील या अपेक्षेने या गावाने राष्ट्रवादी काँग्रेसलाच साथ दिली. परंतु विकास तर झालाच नाही उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी गावाच्या विकासात नेहमी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धमकी दादागिरी करून या तथाकथित नेत्यांनी गावात दहशत पसरविली. या विरुद्ध कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर ही मंडळी त्याला शिवीगाळ करून धमकी देतात. तरीही गावाने कधी या दहशती विरुद्ध आवाज उठविला नाही. या दडपशाही विरूद्ध आवाज उठविण्याचा निर्णय घेऊन आज सर्व गावकऱ्यांनी महाबळेश्वर पंचायत समितीवर मोर्चा काढला व आपली कैफियत वरिष्ठांच्या कानावर घातली. आपल्या मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिले. (प्रतिनिधी)उपाययोजना करण्याची मागणीतसेच गावचे सरपंच शंकर नारायण जाधव व दगडु लक्ष्मण शिंदे व संगिता प्रकाश जाधव या दोन सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. या गावकरी मंडळीनी गट विकास अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांची भेट घेतली व त्यांनतरही निवेदन देवुन या प्रकरणी गावाला न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झांजवड सरपंचासह तिघांचा राजीनामा
By admin | Updated: December 2, 2014 23:35 IST