शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वळणाने घेतला तिघांचा बळी

By admin | Updated: May 9, 2017 23:31 IST

वळणाने घेतला तिघांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कशामगाव : कऱ्हाड-पुसेसावळी मार्गावरील शामगाव घाटात धोकादायक वळणावर पिकअप जीप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन पिता-पुत्रासह तिघे ठार झाले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला. प्रभाकर विष्णू कुंभार (वय ४०), त्यांचा मुलगा प्रवण प्रभाकर कुंभार (वय १०) व मित्र अहमद मैनुद्दीन झारी (वय १९, तिघेही रा. खटाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात ठार झालेले प्रभाकर कुंभार हे सैन्य दलामध्ये सेवेत होते. येत्या दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यापुर्वीच काळाने त्यांच्यासह मुलगा व मित्रावर घाला घातला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खटाव येथील प्रभाकर कुंभार हे काही दिवसांपुर्वी गावी आले होते. सोमवारी कामानिमित्त ते मुलगा प्रणव व मित्र अहमद यांना घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच ११ एए ३६२८) कऱ्हाडला आले. काम आटोपून ते रात्री परत खटावला निघाले होते. ते शामगाव घाटात प्राचिन शिव मंदिराजवळील वळणावर पोहोचले असताना समोरून आलेल्या पिकअप जीपची (क्र. एमएच ११ टी ७१२५) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. संबंधित पिकअप जीपमध्ये कामगार होते.शामगाव येथे वीज खांब उभारण्यासाठी ते आले होते. काम आटोपून परत जात असताना पहिल्याच वळणावर ही दुर्घटना घडली. अपघात होताच जीपच्या चालकाने तेथून पोबारा केला. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी प्रभाकर व प्रणव यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर मैनुद्दीन गंभीर जखमी होता. मात्र, उपचारापुर्वीच त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची नोंद मसूर पोलिस दुरक्षेत्रात झाली आहे.