शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांमध्ये ‘माणूस’ वाचला!

By admin | Updated: October 15, 2015 00:31 IST

सह्याद्री व्याघ्रप्रकल्प : ‘लोकमत’च्या मालिकेनंतर बाधित जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली; पुनर्वसनाची घोषणा--...पण अगोदर \ माणूसही वाचवा!

पाटण : ‘सेव्ह द टायगर; पण अगोदर माणूस वाचवा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सलग सात दिवस पाटण तालुक्यातील गावांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमुळे कशी ससेहोलपट सुरू आहे. तसेच जनतेच्या प्रश्नाचे व जाचक अटींचे वास्तववादी लिखाण केले होते. त्यामुळेच मळे, कोळणे आणि पाथरपूंज या कोअर (गाभा) क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन केल्याची घोषणा वन्यजीव विभागाने नुकतीच केली.‘लोकमत’मधून वृत्तमालिका सुरू असतानाच पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण, जावळी, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची बैठक बोलावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प समन्वय समितीचा बैठक आढावा घेतला.त्यानंतर लगेच ढेबेवाडी विभागात वन्यजीव विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. त्याद्वारे आता निवी, कसणी, पळशी, मासोली अशा गावांमध्ये शामप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत विकासकामे सुरू केली आहेत.आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना विभागात जाऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न वन्यजीव अधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी बैठक घेतली. या सर्व घटना ‘लोकमत’च्या मालिकेमुळेच घडून आल्या असून, तालुक्यातील व्याघ्रबाधित जनतेला न्याय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)राजाभाऊ शेलार यांचा जलसमर्पणाचा इशारा घाटमाथा ते नवजा आणि कोयना जलाशयाच्या काठावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनमध्ये येणारी १४ गावे वगळावीत तसेच बफर झोन रद्द करावा, खासगी लाँचना परवानगी द्यावी, आदी मागण्या जर २ नोव्हेंबरपर्यंत मान्य झाल्या नाही, तर ५ नोव्हेंबर रोजी कोयना धरणात जलसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. मानवी हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.पांढरेपाणी गावचे पुनर्वसन करणार : शंभूराज देसाईपांढरेपाणी ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी करून तसा प्रस्ताव दिला तर त्या गावचे पुनर्वसन करण्यासंदर्भात नक्कीच कार्यवाही करू, अशी ग्वाही आमदार शंभूराज देसई यांनी ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत दिली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.