लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पिके आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव कमीच मिळत असतो. कारण, सध्या शेतकऱ्यांकडून कोथिंबिरीच्या दहा रुपयांना तीन पेंड्या घेऊन विक्रेते पुढे दहाला एकच विकत असल्याचे दिसून येत आहे. यात विक्रेत्यांचा फायदाच होत आहे, तर दर कमी मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढता येत नाही.
जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव, माण आदी तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. काही शेतकरी तर भाजीपाल्यावर अवलंबून आहेत. वर्षभर भाजीपालाच शेतात घेतात. उत्पादित माल हा सातारा, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो तर काही शेतकरी जागेवरच व्यापारी, विक्रेत्यांना देतात. जागेवरच विकल्यास दर कमी मिळाला तरी चालतो. कारण वाहतूक खर्च वाचत असतो. पण, व्यापारी शेतकऱ्यांकडून कमीच दराने भाजीपाला घेतो. त्यानंतर पुढे दर वाढवून विकला जातो.
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक भाज्यांत विक्रेते मालामाल होतात. कारण, शेतकऱ्यांकडून दहा रुपयांना कधी ३, कधी ४ पेंड्या घेतात. त्यानंतर याच पेंड्या शहराच्या ठिकाणी १०, १५ रुपयांना १ या प्रमाणे विकल्या जातात. त्यामुळे भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...
गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे महागाई वाढली; पण शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. कारण, भाजीपाल्याला अजूनही दर चांगला मिळत नाही; पण पुढे ग्राहकाला देताना जादा दराने विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.
-राजेंद्र कणसे, शेतकरी
बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.
-रामचंद्र पाटील, शेतकरी
ग्राहकांना परवडेना...
कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.
-किरण पठारे, ग्राहक
...................................
मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.
-सदाशिव काळे, ग्राहक
भावात फरक...
बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.
...शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

कोट..
मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.
-सदाशिव काळे, ग्राहक
चौकट..
भावात फरक...
बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.
...
कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)
भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव
वांगी २० ४०
टोमॅटो ०८ २०
कोबी ०८ २०
फ्लॉवर २० ४०
दोडका १५ ४०
कारली १० ४०
बटाटा १५ ३०
मिरची २० ४०
ढबू १० ४०
भेंडी १५ ४०
वाटाणा ५० ८०
शेवगा ४० ८०
........................................................कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)
भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव
वांगी २० ४०
टोमॅटो ०८ २०
कोबी ०८ २०
फ्लॉवर २० ४०
दोडका १५ ४०
कारली १० ४०
बटाटा १५ ३०
मिरची २० ४०
ढबू १० ४०
भेंडी १५ ४०
वाटाणा ५० ८०
शेवगा ४० ८०
........................................................