शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा तीन फ्लॅट फोडले!

By admin | Updated: October 17, 2016 00:33 IST

आगाशिवनगरमध्ये चोरी : साठ हजारांवर रोकड लंपास

मलकापूर : कटावणीच्या साह्याने कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा तीन फ्लॅटमधून सुमारे ६२ हजारांहून अधिक रोखड लंपास केली. आगाशिवनगर येथील बालाजी पार्क या इमारतीत गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील बालाजी कॉलनीमध्ये ‘बालाजी पार्क’ ही इमारत आहे. या इमारतीच्या बी २ फ्लॅटमध्ये हेमंत धोंडिराम घारे हे नऊ वर्षांपासून कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी हेमंत हे कामासाठी बाहेर गेले होते. मुलेही शाळेत गेली असल्याने हेमंतच्या पत्नी खरेदीसाठी कऱ्हाड शहरात गेल्या होत्या. कऱ्हाडमधील कामे आटोपून त्या दुपारी एक वाजता परत घरी आल्या. खरेदी केलेले साहित्य घरात ठेवून त्यांनी घराला कुलूप लावले व थोडावेळ शेजारच्या फ्लॅटमध्ये जाऊन बसल्या. अर्ध्या तासाने त्या बाहेर आल्या असता त्यांच्या दाराचा कोयंडा तुटून कुलूप खाली पडल्याचे निदर्शनास आले. दार उघडे असल्याने घरात चोरी झाल्याची त्यांची खात्री झाली. याबाबत त्यांनी पती हेमंत यांच्यासह शेजाऱ्यांना माहिती दिली. तसेच घरात जाऊन पाहिले असता टेबलचे ड्राव्हर, कपाटाचे दार कटावणीच्या साह्याने उचकटून पर्स, कपाटातील व कपड्यात ठेवलेले सुमारे ५० हजार ६०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर विठ्ठल घाडगे कुटुंबासह राहतात. ते नोकरी निमित्ताने सकाळीच बाहेर गेले होते. त्यांच्याही फ्लॅटमधून चोरट्यांनी १२ हजार रोख रक्कम लंपास केली. तर घाडगे यांच्या शेजारीच दुर्गेश चव्हाण यांचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा बंद फ्लॅट फोडून सुमारे ६२ हजार ६०० रुपये रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेबाबत संबंधित कुटुंबानी तातडीने कऱ्हाड शहर पोलिसांना खबर दिली. एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, चोरीच्या घटनेची नोंद रविवारी दुपारपर्यंत पोलिसांत झाली नव्हती. पोलिसांकडून चालढकल! मलकापूरसह परिसरातून चोरीच्या घटना घडण्याची मालिकाच सुरू आहे. लहान-लहान चोरीच्या घटना पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून नागरिक पोलिसांत नोंदवत नाहीत. आगाशिवनगरात दिग्विजय प्लाझामधील चोरीचे काय झाले, हे आजपर्यंत माहीत नाही. तर बालाजी पार्कमध्ये गुरुवारी झालेल्या चोरीची रविवारपर्यंत नोंद होत नाही. यावरून अशा घटनांबाबत पोलिस चालढकल करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.