शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी-पिकअप धडकेत तीन गंभीर

By admin | Updated: February 19, 2015 23:47 IST

सात किरकोळ जखमी : राजापुरीजवळील तीव्र वळणावर दुर्घटना

परळी : सातारा-ठोसेघर रस्त्यावर साताऱ्यापासून १८ किलोमीटर अंतरावरील राजापुरी फाट्याजवळ एसटी बस आणि पिकअप गाडीच्या (छोटा हत्ती) जोरदार धडक होऊन दहा जण जखमी झाले. त्यातील तीन जण गंभीर असून, सात जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत अधिक माहिती अशी, वावदरेकडून साताऱ्याकडे निघालेली एसटी बस (एमएच २० डीएल १३६६) राजापुरी फाट्यानजीक बोलांगणी नावाच्या रानाजवळ आली. त्याच वेळी रेवंडे, कुस बुद्रुक, परमाळे आणि राजापुरी गावांतील प्रवाशांना घेऊन निघालेली पिकअप गाडी (एमएच ०४ जीयू ६१२६) समोरून येत होती. तीव्र वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेनंतर एसटी बस झाडावर जाऊन आदळली तर पिकअप उलटून पडली.या अपघातात विठाभाई आत्माराम लोटेकर (वय ६०, रा. कुस बुद्रुक, ता. सातारा), आबाजी धोंडिबा भोसले (वय ६०), सीमा बाबुराव भोसले (वय ३५), सारिका भोसले (वय ३०, तिघे रा. रेवंडे, ता. सातारा), चंद्रभागा कदम (वय ५७), हणमंत कदम (वय ६२), संदीप कदम (वय ३५, तिघे रा. परमाळे, ता. सातारा)धोंडिराम गंगाराम साळुंखे (वय ६२), परशुराम श्रीपती साळुंखे (वय ५५), इंदुमती हणमंत साळुंखे (वय ४७, तिघे रा. राजापुरी, ता. सातारा) असे दहा जण जखमी झाले. यातील विठाबाई लोटेकर, आबाजी भोसले आणि चंद्रभागा कदम या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद करण्याचे काम सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)देवदर्शनाहून परतताना अपघातआबाजी धोंडिबा भोसले यांचा मुलगा मनीष यांचा चार दिवसांपूर्वी विवाह झाला. त्यांचे कुलदैवत असणाऱ्या निवकुणे (ता. पाटण) येथे देवदर्शनासाठी घरातील सर्वजण पिकअप व्हॅनमधून गेले होते. गावी परतताना झालेल्या या भीषण अपघातात नवरदेव मनीष यांना किरकोळ जखमा झाल्या, तर आबाजी भोसले गंभीर जखमी झाले. इतर जखमी एसटीमधील प्रवासी आहेत. दोन्ही वाहनांच्या चालकांना दुखापत झाली नाही.