सातारा : येथील एका महिलेस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी एका महिलेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मारिया इम्रान शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुनीता कांबळे (रा. राधिका रोड, सातारा) या मारिया यांच्या घरी कामाला आहेत. मारिया यांच्या पतीने घरातील सोने चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून चिडून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी शेख यांना देण्यात आली. मारिया शेख यांनी सुनीता कांबळे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुुजावर हे तपास करत आहेत.
.....................................................................
...............................................