शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या घाटात धावली हजारो पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/पेट्री : सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या ‘हिल हाफ मॅरेथॉन २०१७’ स्पर्धेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देश-विदेशातील स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. स्पर्धेचे २१ किलोमीटर अंतर पूर्ण करताना आबालवृद्धांचा उत्साह जराही कमी झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/पेट्री : सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या ‘हिल हाफ मॅरेथॉन २०१७’ स्पर्धेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देश-विदेशातील स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. स्पर्धेचे २१ किलोमीटर अंतर पूर्ण करताना आबालवृद्धांचा उत्साह जराही कमी झाला नाही.या स्पर्धेत इथिओपियाच्या चला बेंगा याने २१ किलोमीटर अंतर अवघ्या १ तास ८ मिनिटे आणि २८ सेकंदात पूर्ण करून पुरुष खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकविला. तर इथिओपियाच्याच झेवदितू वोर्की हिने १ तास २४ मिनिटे २० सेकंदात हे पूर्ण करून महिला गटात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.पोलिस परेड मैदान ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट व पुन्हा पोलिस परेड मैदान अशी २१ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा रविवारी (दि. १७) सकाळी सहा वाजता सुरू झाली. पोलिस परेड मैदानात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, हिल मॅरेथॉन असोसिएशनचे संयोजक डॉ. प्रताप गोळे, डॉ. संदीप काटे व पदाधिकाºयांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.स्पर्र्धेसाठी सर्व विभागांनी जय्यत तयारी केली होती. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्पर्धेच्या मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जागोजागी आरोग्य पथकाच्या रुग्णवाहिकाही सज्ज होत्या. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारकरांनी स्पर्धा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती.पुरुष व महिलांच्या खुल्या गटात प्रथम तीन क्रमांक इथिओपियाच्या स्पर्धकांनी पटकविले. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. प्रथम तीन क्रमाकांना अनुक्रमे दीड लाख, एक लाख व पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यवतेश्वर घाटाचेरुप बदलले...स्पर्धकांच्या आगळ्या-वेगळ्या वेशभूषेमुळे यवतेश्वर घाटाला वेगळेच सौंदर्य आले होते. अनेकांनी हे चित्र आपल्या कॅमेºयात बंदिस्त केले. घाटातील निखळ झºयातील पाणी तोंडावर मारून स्पर्धक पुढे जात होते.अधिकाºयांसह लोकप्रतिनिधीही धावलेकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह आमदार शिवेंद्र्रसिंहराजे यांनी देखील हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धकांना प्रेरणा दिली. त्यांच्यासमवेत वेदांतिकाराजे भोसले याही स्पर्धेत सहभागी झाल्या.