शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हजारो सातारकरांचा सायकल रॅलीत सहभाग

By admin | Updated: August 16, 2016 23:00 IST

सायकल क्रांती : पर्यावरणपूरक चळवळीस आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद--लोकमत सायकल क्रांती

सातारा : पर्यावरण संवर्धनासह नागरिकांमध्ये आरोग्य जपण्याची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने शहरात दैनिक ‘लोकमत’ साताऱ्यातील अमर सायकल एजन्सी, आणि फायर फॉक्स बाईक स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘सायकल क्रांती’ रॅलीत हजारो सातारकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थी, व्यावसायिक, डॉक्टर आदींसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला सहभाग हा या रॅलीचे वैशिष्ट ठरले. १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी रॅलीस तालीम संघापासून प्रारंभ झाला. यानंतर रॅली राजवाडामार्गे खालच्या रस्त्याने ५०१ पाटी, शेटे चौक, पोवई नाका, न्यायालय, जिल्हा परिषद, विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून पुन्हा पोवई नाका, शाहू चौक मार्गे तालीम संघ मैदानाकडे आली. या क्रांतीसाठी साताऱ्यातील मान्यवर, सायकल संघटना, हौशी तसेच प्रोफेशनल खेळाडू, व्यावसायिक, नोकरदार व शालेय विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.रविवारी सकाळपासूनच तालीम संघाच्या मैदानावर सायकलस्वारांची गर्दी होऊ लागली. रॅली सुरू होईपर्यंत हजारो सातारकर याठिकाणी उपस्थित झाले. रॅलीत सहभागी प्रत्येक स्पर्धकांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसून येत होता. रॅलीस प्रारंभ झाल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने रॅली शहरातून मार्गक्रमण झाली. आरोग्यासह पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत राबविणे अत्यंत गरजेचे आहे. सायकल एक दिवस न चालविता सायकलचा दैनंदिन जीवनात वापर करावा, अशी भावना अनेक सायकलस्वार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)इंधन बचतीसह आरोग्य संवर्धन‘सायकल क्रांती’ या चळवळीमुळेच दैनंदिन जीवनातील छोटे प्रवास सायकलवर केल्याने इंधन बचत तर होतेच त्याचप्रमाणे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. इंधन बचतीसह आरोग्य संगोपन आणि पर्यावरणजागृती अशा कित्येक बाबी आज सायकलिंगमुळे पूर्णत्वास जात आहे. अशा भावना रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.‘लोकमत’च्या माध्यमातून ही चळवळ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला. हजारोंच्या संख्येने सातारकरांनी ‘सायकल क्रांती’ या चळवळीत सहभागी होऊन सातारा शहर ‘सायकल सिटी’ म्हणून नावारूपास यावे यासाठी प्रयत्न केले. येणाऱ्या काळात इंधन बचत, प्रदूषणमुक्त वातावरण तयार होणार यात काही शंकाच नाही.- आशिष जेजुरीकर