शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बिदालला पाण्यासाठी झटतायत हजारो हात

By admin | Updated: April 5, 2017 23:25 IST

दुष्काळमुक्तीसाठी लढा : लोकसहभागातून उभारला लूज बोल्डर

दहिवडी : ‘कावळ्या कावळ्या पाणी आण चिमणे चिमणे कोट कर’ या उक्तीप्रमाणे संपूर्ण बिदालकर आता पाण्यासाठी एकवटले आहेत. सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय अधिकारीही दिवसरात्र झटत आहेत. गावातील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी श्रमदानातून लूज बोल्डर उभारला आहे.वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० तालुक्यांतील २ हजार ६७ गावे सहभागी झाली आहेत. माण तालुक्यातील ३२ गावांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत उतरलेल्या गावांनी वॉटर कप जिंकायचाच या हेतूने कामाला गती दिली आहे. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत होणार असली तरी प्रत्येक गावाने कामाचा आराखडा तयार केला आहे. ठिकठिकाणी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सांगवे, कृषी अधिकारी राजेश जानकर, पाणी समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये माती परीक्षण, शोष खड्डे, नाडेप, आगकाडी मुक्त शिवार यांची कामे सुरू आहेत. वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावात सर्वात मोठे गाव बिदाल असून, गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सिनेअभिनेते ९ एप्रिलला बिदाल गावात भेट देणार आहे.बिदाल ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धार केला असून, दुष्काळमुक्तीसाठी सुरू असलेली कामे प्रगतिपथावर सुरू आहे. कामाची रोजची माहिती मिळावी व लोकसहभाग वाढावा यासाठी वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली जात आहे. (प्रतिनिधी)अनेकांकडून मदतीचा हात..बिदाल गावामध्ये पाणी फाउंडेशनचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामार्फत दररोज कामाचे नियोजन केले जात आहे. गावामध्ये प्रत्येक कामासाठी कमिट्या नेमल्या आहेत. गावाचे क्षेत्रफळ २५०० हेक्टर असल्याने पाणी अडवण्यासाठी किमान ५० लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. यासाठी मुंबईकर, पुणेकर, सातारकर, फलटणकर यांच्यासह शिक्षक, दानशूर व्यक्ती, बागायतदार, व्यापारी आदींकडून देणगी दिली जात आहे. गावची एकी पाहता गोपूज कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ५ लाख, मोती काका सराफ बारामती २ लाख, संजय गांधी १ लाख यांच्यासह अनेकांनी मदत केली आहे. सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली निधीचे संकलन केले जात आहे.