शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिदालमध्ये पाण्यासाठी झटतायत हजारो हात

By admin | Updated: April 5, 2017 13:38 IST

दुष्काळमुक्तीचा लढा : ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारला लूज बोल्डर, सिनेअभिनेते ९ एप्रिलला भेट देणार

लोकमत आॅनलाईन दहिवडी, दि. ५ : कावळ्या कावळ्या पाणी आण चिमणे चिमणे कोट कर या उक्तीप्रमाणे संपूर्ण बिदालकर आता पाण्यासाठी एकवटले आहेत. सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय अधिकारीही दिवसरात्र झटत आहेत. गावातील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी श्रमदानातून लूज बोल्डर उभारला आहे.वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० तालुक्यांतील २ हजार ६७ गावे सहभागी झाली आहेत. माण तालुक्यातील ३२ गावांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत उतरलेल्या गावांनी वॉटर कप जिंकायचाच या हेतूने कामाला गती दिली आहे. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत होणार असली तरी प्रत्येक गावाने कामाचा आराखडा तयार केला आहे. ठिकठिकाणी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सांगवे, कृषी अधिकारी राजेश जानकर, पाणी समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये माती परीक्षण, शोष खड्डे, नाडेप, आगकाडी मुक्त शिवार यांची कामे सुरू आहेत. वॉटर कप स्पधेर्तील सहभागी गावात सर्वात मोठे गाव बिदाल असून, गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सिनेअभिनेते ९ एप्रिलला बिदाल गावात भेट देणार आहे.बिदाल ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धार केला असून, दुष्काळमुक्तीसाठी सुरू असलेली कामे प्रगतिपथावर सुरू आहे. कामाची रोजची माहिती मिळावी व लोकसहभाग वाढावा यासाठी वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली जात आहे. अनेकांकडून मदतीचा हात..बिदाल गावामध्ये पाणी फाउंडेशनचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामार्फत दररोज कामाचे नियोजन केले जात आहे. गावामध्ये प्रत्येक कामासाठी कमिट्या नेमल्या आहेत. गावाचे क्षेत्रफळ २५०० हेक्टर असल्याने पाणी अडवण्यासाठी किमान ५० लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. यासाठी मुंबईकर, पुणेकर, सातारकर, फलटणकर यांच्यासह शिक्षक, दानशूर व्यक्ती, बागायतदार, व्यापारी आदींकडून देणगी दिली जात आहे. गावची एकी पाहता गोपूज कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ५ लाख, मोती काका सराफ बारामती २ लाख, संजय गांधी १ लाख यांच्यासह अनेकांनी मदत केली आहे. बिदाल गावाने पाणी अडविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे. बिदाल गावचा पाणी प्रश्न कायम मिटणार असून, गावच्या विकासासाठी एकदाच निधी द्या, आयुष्यभर पाणी घ्या, असे आम्ही आवाहन केले आहे.- धनंजय जगदाळे, अध्यक्ष, बिदाल विकास मंडळ