शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

 ढेबेवाडीत स्वच्छतेसाठी हजारो रूपये कचºयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:31 IST

सणबूर (जि. सातारा) : ढेबेवाडी येथील ग्रामिण रूग्णालयासमोर उघड्यावर कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायत अनेकदा कचरा उचलुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हजारो रूपये खर्च करत असताना काही ग्रामस्थ त्याठिकाणी पुन्हा जाणिवपुर्वक कचरा टाकत आहेत. त्यामुळे शाळा परीसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असुन डासांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

ठळक मुद्देढेबेवाडी ग्रामपंचायतीचे प्रयत्न निष्फळढेबेवाडी येथील ग्रामस्थांचा आडमुठेपणाशाळा परीसरात मोकाट कुत्र्यांचा वावर शाळा परीसरात मोकाट कुत्र्यांचा वावर

सणबूर (जि. सातारा) : ढेबेवाडी येथील ग्रामिण रूग्णालयासमोर उघड्यावर कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायत अनेकदा कचरा उचलुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हजारो रूपये खर्च करत असताना काही ग्रामस्थ त्याठिकाणी पुन्हा जाणिवपुर्वक कचरा टाकत आहेत. त्यामुळे शाळा परीसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असुन डासांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

ढेबेवाडी बाजारतळावर झाडाच्या बाजुला उघड्यावर कचरा टाकला जात होता. त्यामुळे बाजारतळाला कचरा डेपोचे स्वरुप आले होते. कचºयामुळे दुर्गंधी पसरुन डासांचा पादुर्भाव वाढत होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पंचायत कचरा उचलण्यासाठी दरमहा हजारो रुपये खर्च करत होती. मात्र त्याठिकाणी पुन्हा कचºयाचे ढिग लागत होते.

शेवटी पंचायतीने त्याठिकाणी कचरा उचलुन संपुर्ण परिसर स्वच्छ करुन पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला. व त्याठिकणच्या झाडाना कट्टे बांधल्याने तिथे खेळण्यासाठी चिमुकल्यांचा वावरही वाढला. तो परिसर आता स्वच्छ झाल्याने उघड्यावर कचरा टाकणे बंद झाले आहे. तर पाण्याची टाकी बांधल्याने बाजारात येणाºया ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. मात्र ग्रामिण रूग्णालयासमोर अजुनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असुन पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.

शाळेतील लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . पैसे खर्च करुन पंचायतीकडुन कचरा उचलला जात असुन कचरा टाकणाºयावर कारवाईचे फलकही लावण्यात आले होते. मात्र, पुन्हा मागचे पाढे पंचावन्न अशी स्थिती असुन कोणालाच कशाचे काही गांभिर्य नसल्याचे वास्तव समोर आले आहे. नविन गावठाणातही हिच  स्थिती आहे. वारंवार त्याठिकाणी कचरा टाकला जात आहे. पोलिस ठाण्यासमोरील रस्त्याशेजारी अशीच स्थिती आहे. उघड्यावर कचरा टाकल्याने परिसराला अवकळा पसरत आहे. गाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी पंचायतीने स्वच्छता अभियान प्रभाविपणे राबवणे गरजेचे आहे.गावात स्वच्छता रहावी यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे. मात्र ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे. ग्रामपंचायतीने प्रयत्न केले तरी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनीच स्वच्छतेसा ठी पुढाकार घ्यायला हवा. - संजय पाटील,उपसरपंच, ढेबेवाडी