शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एका वातीने पेटविले दुकानातील हजारो फटाके

By admin | Updated: October 25, 2014 23:51 IST

ग्रामस्थांची धावपळ : ओंडमध्ये स्टॉल जळून खाक

उंडाळे : ओंड, ता. कऱ्हाड येथे लक्ष्मीपूजनानंतर मुलांनी लावलेल्या फटाक्याच्या माळेतील एक फटाका स्टॉलमध्ये जाऊन पडल्यामुळे एकाचवेळी हजारो फटाके फुटले. यावेळी लागलेल्या आगीत स्टॉल पूर्णपणे जळून खाक झाला. गुरुवारी, दि. २३ रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओंड येथे बसथांब्यालगत परिसरातील तीन ते चार युवकांनी भागीदारीत एक फटाका स्टॉल उभारला होता. गत दहा दिवसांपासून या स्टॉलवरून फटाक्यांची विक्री केली जात होती. लहान मुलांसह युवकही याठिकाणी फटाके खरेदी करण्यासाठी येत होते. संबंधित स्टॉलवर सुतळी बॉम्बसह, रॉकेट, भुईचक्र, फुलबाजे, झाड यासह इतर फटाक्यांचे बॉक्स मोठ्या प्रमाणावर होते. लक्ष्मीपूजनादिवशी सकाळपासूनच या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी होते. सायंकाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता. त्यामुळे संबंधित फटाका स्टॉल परिसरात असलेल्या व्यावसायिकांनी लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर फटाक्यांची माळ लावली. फटाके वाजत असतानाच एक फटाका उडून स्टॉलमध्ये पडला. त्यामुळे तेथील काही फटाक्यांनी पेट घेतला. हा प्रकार निदर्शनास येऊन काही हालचाली करेपर्यंतच इतर फटाके फुटू लागले. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एकाचवेळी शेकडो फटाके फुटत होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. भुईचक्रांचे बॉक्स जमिनीवरच पेटत होते, तर रॉकेट बॉक्समधून बाहेर पडून इतरत्र जात होते. सुतळी बॉम्बही मोठ्या आवाजात फुटत होते. लहान मोठ्या फटाक्यांच्या माळाही वाजत होत्या. त्याठिकाणी जाणेही धोक्याचे बनले होते. या दुर्घटनेत स्टॉलधारक युवकांचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती. (वार्ताहर)युवकांचे प्रसंगावधानफटाके फुटत असताना व आग भडकली असताना गावातील काही युवकांनी धाडस करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मिळेल तेथून पाणी आणून ते युवक आग विझविण्यासाठी धडपडत होते. अखेर तासाभराने सर्व फटाके फुटल्यानंतर आग विझविण्यात युवकांना यश आले.