शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भिमसेन-कुंती उत्सवास हजारोंची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 16:16 IST

तारळे येथील ग्रामदैवत भिमसेन कुंती यात्रा गुरूवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जन करण्यात आले. ‘भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय’च्या घोषात तारळेनगरी दुमदुमली. यावेळी विभागातील हजारो भाविक उपस्थित होते

ठळक मुद्दे‘भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय’च्या घोषात तारळेनगरी दुमदुमलीगुलालाची उधळण; भक्तीमय वातावरण मुर्तींचे विसर्जनकडक पोलीस बंदोबस्त तैनातविविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन

तारळे : येथील ग्रामदैवत भिमसेन कुंती यात्रा गुरूवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जन करण्यात आले. ‘भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय’च्या घोषात तारळेनगरी दुमदुमली. यावेळी विभागातील हजारो भाविक उपस्थित होते

.शेकडो वर्षाची परंपरा असलेली यात्रा आजही पारंपारीक पद्धतीने साजरी केली जाते. नागपंचमीच्या मुहूर्तावर भिमसेन सभामंडपात कुंभार बांधवांकडून सुमारे दहा फुट उंचीची मातीची मुर्ती बनविण्यास प्रारंभ केला जातो. तर कुंभारवाड्यात शाडुपासून तीन फुट उंचीची कुंती मातेची मुर्ती बनविण्यास सुरूवात होते. भिमसेन मुर्ती बनविल्यानंतर त्यावर भिमसेन मंडळाकडून वस्त्र, नक्षिकाम, अलंकार, फेटा बसवून मुर्ती सुशोभित व आकर्षक केली जाते. 

गणेश चतुर्थीपुर्वी कुंती मातेची मुर्ती सभामंडपात आणली जाते. त्यानंतर अखंड विणा, भजन तसेच दररोज महाआरतीला सुरूवात होते. त्यानंतर दोन दिवस यात्रा संपन्न होते. बुधवारी, दि. ६ सकाळपासुन विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जाधव आळीतील मानाचे उदबत्तीचे झाड ढोल ताशाच्या गजरात आणी गुलालाची उधळण करीत सभा मंडपाजवळ आणण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यंदा महेश कारंडे यांनी महाप्रसादाचा खर्च केला. 

गुरूवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळपासुनच ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी लवकरच कुंती मातेचा रथ मिरवणुकीने भिमसेन मंडपाजवळ आणण्यात आला. त्याठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण केली. पुढे कुंतीमातेचा रथ आणि त्यामागे भिमसेन रथाची मिरवणूक निघाली. बाजारपेठ, चांदणी चौक, मुख्य रस्त्याने मिरवणूक तारळी नदीपर्यंत आणण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती.कडक पोलीस बंदोबस्त तैनात

भिम-कुंती उत्सवाचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गावात मिठाईच्या दुकानांचीही रेलचेल होती. यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक एम. के. आवळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.